---Advertisement---

कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा; हवेत उडी मारत राहुलने एकहाती टिपला सॅमसनचा अवघड झेल

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 9:05 AM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मंगळवार रोजी (२१ सप्टेंबर) दुबई येथे झालेला सामना राजस्थानने २ धावांनी जिंकला. शेवटच्या षटकापर्यंत पारडे जड दिसत असलेल्या पंजाबला अंतिम षटकात अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. राजस्थानच्या युवा कार्तिक त्यागीने जबरदस्त गोलंदाजी करत शेवटच्या षटकात सामन्याचा कायापालट केला. दरम्यान पंजाब संघातील खेळाडूंनीही फलंदाजीबरोबर गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणात शानदार प्रदर्शन केले होते. त्यातही पंजाबचा कर्णधार केएल राहुल याने टिपलेला एक झेल सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.

कारण पंजाबच्या या संघनायकाने अजून कोणाला नव्हे तर विरोधी संघाचा कर्णधार संजू सॅमसन याला हा झेल टिपत पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

तर झाले होते असे की, प्रथम फलंदाजीस आलेल्या राजस्थान संघाला सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात करुन दिली होती. परंतु अर्शदिप सिंगने सलामीवीर एविन लुईसला मयंक अगरवालच्या हातून झेलबाद करत ५४ धावांवर राजस्थानला पहिला झटका दिला होता. त्यानंतर स्वत कर्णधार सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. संथ सुरुवात करत पुढे मोठी आकडी धावसंख्या करणाऱ्या सॅमसनकडून या सामन्यातही मोठ्या खेळीची अपेक्षा होती.

परंतु डावातील आठव्या षटकातील इशान पोरेलच्या पहिल्या शॉर्ट वाइड चेंडूवर त्याने विनाकारण फटका मारला. यावर टॉप एजच्या दिशेने गेलेला सॅमसनचा चेंडू पकडण्याची नामी संधी यष्टीमागे उभा असलेल्या राहुलकडे होती. परंतु चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या बाजूने निघून जाईल असे दिसत होते. इतक्यात त्याने हवेत डाईव्ह मारत एका हाताने तो चेंडू पकडला.

https://twitter.com/KartikS25864857/status/1440336122949685254?s=20

अशाप्रकारे एका कर्णधारानेच दुसऱ्या संघाच्या कर्णधाराला झेलबाद केल्याचे दुर्मिळ दृश्य या सामन्यात पाहायला मिळाले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

राहुलच्या अचूक झेलमुळे सॅमसन ५ चेंडूंमध्ये फक्त ४ धावा करत बाद झाला. दुसरीकडे राहुलने फलंदाजी करताना संघासाठी ३३ चेंडूंमध्ये ४९ धावांची खेळी खेळली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

हा कोणता सरपटणारा प्राणी? लाईव्ह सामन्यात निकोलसने केलं असं काही की हसू हसू दुखेल पोट

असा विक्रम होणे नाही! आयपीएल इतिहासात कधीही न घडलेला पराक्रम, पंजाब-राजस्थान सामन्यात झाला

अर्शदीप सिंगने ५ विकेट्स तर घेतल्या, पण ‘हा’ नकोसा विक्रमही झाला नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---