ऑस्ट्रेलिया दौर्यावरील भारतीय संघामागे लागलेला दुखापतींचा ससेमिरा संपण्याची चिन्हे नाहीत. ५-६ खेळाडू आधीच दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता शैलीदार फलंदाज केएल राहुल देखील दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार राहुलला सरावात दुखापत झाली. शनिवारी भारतीय संघ मेलबर्नच्या मैदानावर नेटमध्ये सराव करत असताना राहुलच्या डाव्या मनगटाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने राहुल उर्वरित मालिकेला मुकणार असल्याचे समजते.
UPDATE: KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy.
More details 👉 https://t.co/G5KLPDLnrv pic.twitter.com/S5z5G3QC2L
— BCCI (@BCCI) January 5, 2021
राहुल आता मायदेशी परतणार असून बंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेईल. मात्र ऑस्ट्रेलिया दौर्यावर तिसर्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता असतानाचा ही दुखापत झाल्याने भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.