---Advertisement---

मोठ्या मनाचा कर्णधार! स्वत:ला नव्हे तर ‘या’ २ खेळाडूंना दिले पंजाब किंग्जच्या विजयाचे श्रेय

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 10:29 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. सोमवारी (१२ एप्रिल) पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात, पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी बाजी मारली आहे. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत माहीत नव्हते की कुठला संघ जिंकणार आहे. या विजयानंतर ९१ धावांची तुफानी खेळी करणाऱ्या कर्णधार केएल राहुल याने विजयाचे श्रेय संघातील युवा खेळाडूंना दिले आहे.

आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात हा दुसरा असा सामना रंगला होता, ज्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कुठला संघ जिंकेल हे माहीत नव्हते. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला २२२ धावांचे मोठे आव्हान होते. हे आव्हान पूर्ण करताना कर्णधार संजू सॅमसन याने शतक झळकावले. शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना तो झेलबाद झाला आणि हा सामना पंजाब किंग्ज संघाने जिंकला.

सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत केएल राहुल म्हणाला, “मी कधीच माझ्या संघावर विश्वास ठेवणे बंद केले नाही. मला माहित होते की १, २ गडी बाद केले की आम्ही पुन्हा सामन्यात पुनरागमन करु शकतो. खेळ इतका पुढे गेला कारण आम्ही खूप सोपे झेल सोडले. १०, ११ व्या षटकापर्यंत आम्ही चांगली गोलंदाजी केली होती. आम्ही यापूर्वी देखील अशा परिस्थितीचा सामना केला आहे. त्यामुळे आमच्यासाठी हे काही नवीन नव्हते. परंतु अशा विजयाने संघ एकजूट होत असतो. गोलंदाजांना यातून शिकायला मिळेल.”

दीपक हुड्डा आणि अर्शदीप सिंग यांचे केले तोंडभरून कौतुक
तसेच तो पुढे म्हणाला, “संघात खूप प्रतिभाशाली खेळाडू आहेत. दीपक हुड्डाने जी खेळी केली ती उल्लेखनीय होती. अशाच प्रकारच्या निडर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाची आवश्यकता आम्हाला आयपीएलमध्ये असते. सामना कधी खाली जातो तर कधी वर जातो त्यामुळे निडर होऊन खेळणे महत्वाचे असते. गेल आणि हुड्डा या दोघांनीही उत्कृष्ट फलंदाजी केली. मी नेहमीच महत्वाच्या षटकांमध्ये अर्शदीपची निवड करतो. तो अशा परिस्थितीत एन्जॉय करून गोलंदाजी करतो. त्याला सामन्यात बनून राहायला आवडते. तसेच त्याला स्वतःच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे. ही एक चांगली बाब आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

Video: झेल घेण्याच्या प्रयत्नात शमी-राहुलची जोरदार धडक, कर्णधाराची रिऍक्शन होती पाहण्यासारखी

पंजाब किंग्जच्या नव्या जर्सीची नेटकऱ्यांनी केली थट्टा; चहलही म्हणाला, ‘वेलकम टू आरसीबी बॉइज’

बरोबर ६ वर्षांनी हुडाने केली तशीच अर्धशतकी खेळी, फरक फक्त एवढाच तेव्हा राजस्थानसाठी तर आता राजस्थानविरुद्ध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---