---Advertisement---

वनडे मालिकेत सपाटून पराभव झाल्यावर दु:खी झाला केएल राहुल; त्याच्या भावुक पोस्टवर गर्लफ्रेंडची लक्षवेधी कमेंट

On: मंगळवार, जानेवारी 25, 2022 4:54 PM
Athiya-Shetty-KL-Rahul
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघाला कसोटी मालिकेसोबत एकदिवसीय मालिकासुद्धा गमवावी लागली आहे. १ कसोटी सामना जिंकण्यात भारताला यश आले, पण भारताला तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या सामन्यात संघ विजयाच्या अगदी जवळ पोहचला होता. पण ४ धावांनी भारताला सामना गमवावा लागला. दरम्यान, एकदिवसीय मालिकेनंतर भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुल याने प्रतिक्रिया दिली आहे.

एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे केएल राहुलने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत संघाची कमान सांभाळली.

राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला तिन्ही सामन्यांत अपयश आल्यामुळे राहुलच्या नावावर खराब कामगीरी केल्याचा विक्रम नोंदवला आहे. तो पहिला कर्णधार बनला ज्याच्या नेतृत्वाखालील पहिल्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर सोमवारी केएल राहुलने खेळाडूंसोबतचा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहली आहे.

त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “कठीण प्रवास तुम्हाला चांगले आणि मजबूत बनवण्यास मदत करतो. असं होऊ शकत की निकाल आमच्यासाठी अनुकूल नसतील, परंतु आम्ही चुकांमधून शिकू. देशाचे नेतृत्व करणे हा अत्यंत सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण होता, जो शब्दात व्यक्त करता येणार नाही. काम कधीही थांबत नाही, कारण आपली प्रगती करण्यावर आणि कधीही हार न मानण्यावर लक्ष केंद्रित करतो. तुम्हा सर्वांच्या पाठींब्याबद्दल आभार.”

https://www.instagram.com/p/CZHBqyklbr3/

त्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी राहुलच्या समर्थनार्थ चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर ५ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच ३ हजारांहून अधिक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘काळ चांगला असो किंवा वाईट, राहुल भाई आम्ही तुमच्यासोबत आहे.’ तसेच श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनीही राहूलच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीनेही राहुलच्या पोस्टवर कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केला आहे. खास बाब म्हणजे अथियाच्या कमेंटवर जवळपास ९०० लाईक्स आल्या आहेत. अथिया ही बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी असून ती गेल्या काही दिवासांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलबरोबर रिलेशनशीपमध्ये आहे.

KL Rahul Comments
Photo Courtesy: Instagram/rahulkl

त्यांचे एकत्र फिरतानाचे, डिनर डेटला जातानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जवळपास तीन वर्षे ते रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळेचं तिच्या कंमेंटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

एकदिवसीय मालिकेत राहुल चांगली खेळ करू शकला नाही. पार्लमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला फक्त १२ धावा करता आल्या. तसेच पार्लमध्येच पार पडलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आणि ५५ धावा केल्या. केपटाऊनमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त ९ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

चहल आणि कुलदीप विराटपेक्षा जास्त धोनीचं ऐकायचे; दिनेशने सांगितले ‘कुलचा’च्या अपयशामागचे कारण

शफाली वर्मा पुन्हा ‘एक नंबर’! स्मृतीला नुकसान, तर दिप्ती ‘टॉप थ्री’मध्ये

आपण फेकलेल्या गुगलीतच फसली राजस्थान रॉयल्सची टीम, नव्या लखनऊ संघाने अशी जिरवली मस्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---