भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे. पण राहुलचे काही पोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये त्याने सरावाला सुरुवात केल्याचे समजतेच, सोबतच त्याच्या हातात ग्लोव्ज दिसत आहेत. चाहते आपल्या आवडच्या खेळाडूला बऱ्याच दिवसांनी विकेटकीपिंगचा सराव करताना पाहून आनंद व्यक्त करत आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार केएल राहुल (KL Rahul) आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूनीवर फिट झाला आहे. नुकताच सरवा सत्रातील त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. राहुल यामध्ये विकेटकीपिंगचा सराव करताना दिसत आहे. रिषभ पंत याने मागच्या काही वर्षात संघातील आपले स्थान नियमित केले होते. पण डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर पंत संघातून बाहेर आहे. अशात संघ व्यवस्थापनाला एक असा यष्टीरक्षक फलंदाज हवा आहे, जो विश्वचषक आणि आशिया चषकात पंतची जागा भरण्यासाठी तयार असेल. आयपीएल 2023दरम्यान दुखापत झाल्याने राहुल अर्ध्या हंगामातून बाहेर पडला होता. पण आता त्याने फिटनेस मिळवल्याचे दिसते.
Great news for the Indian team.
KL Rahul has started wicket-keeping practice. pic.twitter.com/1aCmcCW1LL
— Johns. (@CricCrazyJohns) August 2, 2023
संघ व्यवस्थापन केएल राहुल (KL Rahul Fitness) याला विश्वचषक 2023 आणि त्याआधी होणाऱ्या आशिया चषकात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडू शकते. मागच्या मोठ्या काळापासून राहिल संघात केवळ फलंदाजाच्या रूपात खेळत आला आहे. अशात पुन्हा एकदा हातामध्ये ग्लोव्ज घालण्याआधी त्याला सराव करावा करणे आवश्यक असेल. याच पार्श्वभूनीवर संघ व्यवस्थापनाने त्याला विकेटकीपिंगचा सराव करायला सांगितले असू शकते. माध्यमांमध्ये राहुलच्या या व्हायरल फोटो आणि व्हिडिओविषयी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत.
https://twitter.com/kunaalyaadav/status/1686646894196625408?s=20
आशिया चषक 2023 चालू महिन्यात म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि शेवटचा सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर संघाला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेलायची आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ थेट वनडे विश्वचषकात खेळताना दिसेल. 5 ऑक्टोबर रोजी वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. व्हायरल फोटोंमुळे चाहत्यांमध्ये संघाच्या यष्टीरक्षक फलंदाजाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. (KL Rahul started wicketkeeping before the World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकच्या 70 धावांच्या खेळीमागे विराटचा हात! मालिका विजयानंतर कर्णधाराने स्वतः केला खुलासा
WORLD CUP 2023 । भारत-पाक सामन्याविषयी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरचा सामना रद्द, शेड्यूल बदलले