---Advertisement---

“हा पराभव पचवणे खूप कठीण”, हातात असलेला सामना गमावल्यामुळे कर्णधार राहुल भावुक

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 12:19 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील ३२ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्स संघाला विजय मिळवून आघाडी घेण्याची सुवर्णसंधी होती. परंतु अंतिम षटकात या संघाला २ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुल भावुक झाला होता.

पंजाब किंग्स संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे दुसऱ्या टप्प्यात हा संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु दुसऱ्या टप्प्यात देखील तेच चित्र पाहायला मिळाले आहे. हा संघ पुन्हा एकदा विजयाच्या टोकाला जाऊन पराभूत झाला आहे. शेवटच्या षटकात पंजाब संघाला विजयासाठी अवघ्या ४ धावांची आवश्यकता होती. तरीदेखील पंजाब संघातील फलंदाजांना या धावा करता आल्या नाहीत. परिणामी पंजाब किंग्स संघाचा २ धावांनी पराभव झाला.

या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुल याने म्हटले की, “हा पराभव पचवणे कठीण आहे. कारण आम्हाला दबावाचा आणखी चांगल्या प्रकारे सामना करावा लागणार आहे. हा पराभव पचवणे कठीण आहे, कारण आम्ही आमच्या चुकांमधून काहीच शिकलो नाहीये. आम्ही सुरुवातीच्या ६ षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. परंतु दुर्वेवाने एकही चेंडू बॅटचा कडा घेत, क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला नाही. त्यानंतर आम्ही शेवटच्या षटकांमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती.”

अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाची बाजी
या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वालने ४९ धावांची खेळी केली होती. तर महिपाल लोमरोरने ४३ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर रॉयल्स संघाला २० षटक अखेर १८५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना मयंक अगरवालने सर्वाधिक ६७ तर कर्णधार केएल राहुलने ४९ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात पंजाब किंग्स संघाला विजय मिळवण्यासाठी ४ धावांची आवश्यकता होती. परंतु कार्तिक त्यागीच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबचे फलंदाज निष्प्रभ ठरले.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिनकडून ट्यूशन घेऊन मैदानात उतरला अन् पंजाबची घेतली शाळा! वाचा जयस्वालच्या ‘यशस्वी’ खेळीमागचं गुपित

चौकार वा षटकार होता निश्चित, इतक्यात एलनने डाईव्ह मारत घेतला ‘फॅब्युलस’ झेल; फलंदाजानेही केलं कौतुक

ना हसू आलं, ना आसू! अंतिम षटकातील संघाच्या दुर्देवी पराभवाला पाहून राहुलच्या चेहऱ्याचा उडाला रंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---