चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2024 साठी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. ऋतुराजनं दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून ही जबाबदारी घेतली. ऋतुराजचा सीएसकेसोबत आयपीएलचा प्रवास उत्कृष्ट राहिला आहे. त्याला बऱ्याच दिवसांपासून धोनीचा उत्तराधिकारी मानलं जात होतं. ऋतुराज गायकवाड सीएसकेचा कर्णधार बनल्यानंतर लोकांनी गुगलवर त्याच्या पत्नीबद्दल सर्च करायला सुरुवात केली. चला तर मग आता आम्ही तुम्हाला ऋतुराजच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत.
ऋतुराज गायकवाडनं उत्कर्षा पवारसोबत 3 जून 2023 रोजी लग्न केलं. उत्कर्षा पवार ही देखील क्रिकेटपटू राहिली आहे. तिनं अनेक पातळ्यांवर महाराष्ट्राच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. उत्कर्षा ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती फलंदाजीसह उजव्या हातानं मध्यम वेगवान गोलंदाजी करते. तिनं 2015 ते 2018 पर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम विभागीय अंडर-19 आणि पश्चिम विभागीय अंडर-23 चं प्रतिनिधित्व केलं आहे. ‘टीम इंडिया सी’कडून खेळणं हा उत्कर्षासाठी अभिमानाचा क्षण होता.
याशिवाय उत्कर्षा 23 वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफीही खेळली आहे. तिनं वुमन्स प्रीमियर लीगमध्येही नाव नोंदवलं होतं. तिची मूळ किंमत 10 लाख रुपये होती. परंतु दुर्दैवाने तिला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. उत्कर्षा सध्या पुण्यातून शिक्षण पूर्ण करत आहे. तिनं 15 नोव्हेंबर 2021 रोजी पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
महेंद्रसिंह धोनीचा कर्णधार म्हणून मोठा वारसा आहे. आता ऋतुराजच्या खांद्यावर हा समृद्ध वारसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी असेल. त्याच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे एमएस धोनीसारखा अनुभवी खेळाडू अजूनही विकेटच्या मागे उभा राहणार आहे, जो त्याला प्रत्येक क्षणी मदत करण्यास तयार असेल.
ऋतुराज 2020 पासून सीएसके सोबत आहे. त्यानं सप्टेंबर 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं 52 सामन्यांच्या 52 डावांत 1797 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 39.07 आणि स्टाइक रेट 135.52 एवढा राहिला. ऋतुराजच्या नावावर आयपीएलमध्ये 14 अर्धशतकं आणि एक शतक आहे. त्यानं 2021 हंगामात सर्वाधिक धावा करत ‘ऑरेंज कॅप’ जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर काय आहे धोनीचा भविष्यातील प्लॅन? ऋतुराजकडे नेतृत्व का दिलं?
IPL 2024 मध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल? काय असेल त्याची संघातील भूमिका?