---Advertisement---

टी-20 विश्वचषकासाठी किती भक्कम आहे भारतीय संघ? जाणून घ्या ताकत आणि कमजोरी

On: बुधवार, सप्टेंबर 14, 2022 9:05 PM
Team India
---Advertisement---

पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. बीसीसीआयने विश्वचषकासाठी सोमवारी (12 सप्टेंबर) संघ घोषित केला. विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघात काही महत्याच्या नावांचा समावेश केला गेला आहे. यावेळी बीसीसीआयने फलंदाज आणि गोलंदाज यांच्या योग्य ताळमेळ बांधल्याचे दिसत आहे. संघात 7 फलंदाज, 5 गोलंदाज आणि 3 अष्टपैलूंचा समावेश केला आहे.

टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यावर वरची फली सांभाळण्याची जबाबदारी आहे. दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर तो चांगले प्रदर्शन करू शकला. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांचे समिकरत धमाका करू शकते. त्यांना हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांची साथ मिळेल. अष्टपैलू हार्दिक पंड्या देखील सध्या चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे. विश्वचषकात हे सर्वजण मिळून विरोधी फलंदाजांचा घाम काढू शकतात.

भारतीय संघातील कमजोर दुवे –
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला टी-20 विश्वचषकासाठी संधी मिळाली आहे. परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये जर तो सहभागी झाला, तर चांगले प्रदर्शन करेलंच, अशी खात्री देता येत नाही. पंतच्या जागी कार्तिकला खेळवले तर संघाला अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरची फळी लवकर बाद झाली, तर मध्यक्रमात सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांच्यावरील जबाबदारी वाढेल.

गोलंदाजांमध्ये बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरून नुकतेच मैदानात पुनरागमन करत आहेत. विश्वचषकापूर्वी मायदेशात खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्यांचा फॉर्म समजू शकेल. अष्टपैलू रविंद्र जडेजा आशिया चषकादरम्यान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला. त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली असून त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात सामील केले गेले आहे. असात त्याला जडेजाची कमी भरून काठावी लागेल. अक्षरचे यापूर्वीचे प्रदर्शन पाहिले, तर ही जबाबदारी त्याला पार पाडता येईलच, याविषया शंका आहे.

दरम्यान आशिया चषका येत्या 16 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होईल आणि अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारताला त्याच्या विश्वचक अभियानाची सुरुवात 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध करायची आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा चांगला सराव होईल. मागच्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात निराशाजनक प्रदर्शन करणाऱ्या भारताकडून यावर्षी चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहे. दिग्गज विराट कोहली देखील आता फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे.

टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ – 
7 फलंदाज – 
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक).
2  अष्टपैलू फिरकी गोलंदाज-
आर. अश्विन आणि अक्षर पटेल.
1 अष्टपैलू वेगवान गोलंदाज-
हार्दिक पंड्या
1 फिरकी गोलंदाज – 
युझवेंद्र चहल
4 वेगवान गोलंदाज 
जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू –
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या- 
अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत बांगलादेशची वर्ल्डकपसाठी संघनिवड; शाकिबकडे नेतृत्व
पाकिस्तानच्या शाळांमध्ये विद्यार्थी गिरवतायेत बाबर आझमचे धडे, सर्वत्र रंगलीये चर्चा
ऑस्ट्रेलियात रोहित-राहुल अन् पंतची बॅट होते म्यान! आशा फक्त विराटवर; पाहा आकडेवारी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---