येत्या २४ डिसेंबर रोजी ‘८३’ चित्रपट (83 movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने जिंकलेल्या १९८३ च्या विश्वचषकावर आधारीत आहे. तसेच कपिल यांची हुबेहूब भूमिका साकारली आहे, ती म्हणजे प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh). चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यापासून रणवीर सिंग आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. अशातच त्याने आता या चित्रपटासाठी स्वतःला कसं तयार केलं, किती मेहनत घ्यावी लागली. याचा खुलासा केला आहे. (Ranveer Singh interview)
रणवीर सिंगने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “कपिल देव यांची गोलंदाजी करण्याची शैली वेगळी होती. माझं शरीर त्यांच्या शरीरापेक्षा वेगळं होतं. ज्यामुळे मला ती शिकून घ्यायला खूप वेळ लागला. ही गोलंदाजी शिकण्यासाठी मला माझ्या फिजिकमध्ये खूप बदल करावे लागले. बराच वेळ गेला. खरे तर अचूक गोलंदाजी ॲक्शन व्हायला काही महिने लागले.”
रणवीर सिंगने ‘सिंबा’ चित्रपटाची शूटिंग झाल्यानंतर ‘८३’ चित्रपटाची शूटिंग सुरू केली होती. त्यावेळी त्याची बॉडी चांगली होती. परंतु, कपिल देवसारखं दिसण्यासाठी त्याला वजनाने आणि शरीराने कमी व्हावं लागलं होतं. त्यावेळी प्रशिक्षकाने त्याला म्हटले होते की, “तू गोलंदाजी करायला येतो तेव्हा असे वाटते की, कुठला पहिलवान गोलंदाजी करायला येतोय. इतकेच नव्हे तर एक महिना प्रशिक्षकांनी मला गोलंदाजी पासून दूर ठेवले होते. त्यांनी मला म्हटले होते की, कपिल सारख्या ॲथलेटीक बॉडीवर अधिक लक्ष केंद्रित कर. त्यानंतर माझी बॉडी तशी व्हायला लागली. त्यावेळी मी पुन्हा गोलंदाजी सुरू केली.”
अधिक वाचा – कपिल देवच्या नेतृत्त्वाखालील विश्वचषक विजयाचा प्रवास येणार सर्वांसमोर; ‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
तसेच गोलंदाजी करण्याच्या शैलीबाबत बोलताना तो म्हणाला की, “कपिल देव सारख्या शैलीसाठी मी दररोज ४ तास सराव करायचो. हे काम मी सलग ६ महिने केलं. यादरम्यान मला अनेक दुखापती देखील झाल्या होत्या. परंतु मला त्यांच्यासारखी शैली हवी होती.”
तसेच कपिल देव यांनी रणवीर सिंगची मेहनत पाहून त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांनी एएनआयला म्हटले की, “रणवीर सिंग एक दिग्गज अभिनेता आहे. त्याला माझ्या सल्ल्याची गरज नाही. त्याने फक्त माझ्यासोबत वेळ घालवता. बाकी तो स्वतः खूप हुशार आहे.”
‘८३’ चित्रपट येत्या २४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ
भुवनेश्वर कुमारने शेअर केला नवजात मुलीचा पहिला फोटो; चाहते म्हणाले, ‘नाव तरी सांगा’
व्हिडिओ पाहा – आजच्याच दिवशी भारतीय संघाने मिळवले होते पहिले ऐतिहासिक जगज्जेतेपद






