हॅमिल्टन। आज(29 जानेवारी) भारताने न्यूझीलंडविरुद्ध सेडन पार्क येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात सुुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला आहे.
विराट हा न्यूझीलंडमध्ये टी20 मालिका जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 मालिका न्यूझीलंडमध्ये खेळल्या होत्या. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला टी20 मालिका जिंकण्यात अपयश आले होते.
विशेष म्हणजे विराटची ही न्यूझीलंडमधील खेळाडू तसेच कर्णधार म्हणून ही पहिलीच टी20 मालिका आहे.
आज झालेला सामना निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 17 धावा करत भारताला 18 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने मिळून 20 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या.
तत्पूर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या होत्या आणि 180 धावांचे आव्हान न्यूझीलंडला दिले होते. यामध्ये रोहितने 65 धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 6 बाद 179 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून कर्णधार केन विलियम्सनने 95 धावांची अर्धशतकी खेळी केली.
सामना जिंकून देणाऱ्या रोहित शर्माच्या त्या २ षटकारांचा काहीच उपयोग नाहीhttps://t.co/sGYdmuYJTP#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia #SuperOver
— Maha Sports (@Maha_Sports) January 29, 2020
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय; अशी रंगली सुपर ओव्हर
वाचा👉https://t.co/vyCccVvia9👈#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia #SuperOver— Maha Sports (@Maha_Sports) January 29, 2020