---Advertisement---

‘धोनीसारख्या खेळाडूची भारतीय संघाला गरज’, दिग्गजाला झाली ‘माही’ची आठवण

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 10:53 PM
---Advertisement---

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) सिडनी येथील वनडे मालिकेने सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला ६६ धावांनी पराभूत करत, विजयी प्रारंभ केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले ३७५ धावांचे आव्हान भारतीय संघाला पेलले नाही आणि भारतीय संघाची धावसंख्या ३०८ पर्यंत मर्यादित राहिली. भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरल्याने, वेस्ट इंडिजचे दिग्गज वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांना माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याची आठवण झाली.

धोनीविना भारत संघर्ष करणार, हे माहीत होते

सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज राहिलेल्या होल्डिंग यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, “भारताकडे बरेच चांगले खेळाडू आहेत. पण, मला एक गोष्ट माहीत होती की, कोहलीचा संघ धोनीविना संघर्ष करेल. धोनी मधल्या फळीत फलंदाजी करीत असे आणि तो सामन्यावर नियंत्रण ठेवत. धोनी संघात असताना भारताने कितीतरी मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग केला होता. नाणेफेक जिंकून विरोधी संघाला प्रथम फलंदाजी देण्यास तो कधीही घाबरला नव्हता. कारण, धोनीची क्षमता काय आहे, हे सर्वजण जाणतात.”

भारताचे फलंदाज प्रतिभावंत

होल्डिंग यांनी सध्याच्या भारतीय संघाची प्रशंसा करताना म्हटले, “भारताची फलंदाजी फळी अतिशय प्रतिभावान आहे. संघात अनेक गुणवंत खेळाडू आहेत, जे मोठे फटके खेळू शकतात. तरीही संघाला धोनीसारख्या खेळाडूची गरज आहे. मात्र, या खेळाडूंमध्ये धोनीसारखी क्षमताच नाही, तर त्याची ताकदही आवश्यक आहे.”

धोनी धावांचा पाठलाग करण्यात माहीर होता

धोनीला आपल्या कारकीर्दीत सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळख मिळाली होती. याविषयी बोलताना होल्डिंग म्हणाले, “जेव्हाही भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करायचा, तेव्हा धोनी कधीही अस्वस्थ होत नव्हता. तो सामन्याला एकटा नियंत्रित करायचा. त्याला आपल्या प्रतिभेवर विश्वास होता. धावांचा पाठलाग कसा करायचा हे त्याला पक्के माहीत होते. त्याच्यासह खेळणाऱ्या फलंदाजांना तो नेहमी मार्गदर्शन करत.”

भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार राहिलेल्या एमएस धोनीने भारताला अनेक सामन्यात मोठ-मोठ्या धावांचा पाठलाग करून दिला होता. जागतिक क्रिकेटमधील आजवरचा सर्वोत्तम फिनिशर म्हणून त्याला संबोधण्यात येते. धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल

‘मला आरसीबीसाठी खेळायला मिळेल का?’, इंग्लंडच्या कर्णधाराच्या प्रश्नावर विराटने दिले ‘हे’ उत्तर

फलंदाज म्हणून हार्दिक ऐवजी ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे होती संधी, माजी भारतीय दिग्गजाचे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

वनडेत सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावा करणारे संघ, भारताच्या नावे ‘हा’ विक्रम

आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ३ ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरुद्ध पहिल्या वनडेत चमकले

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---