---Advertisement---

Video: विराट जरा जपून…! पहिल्या टी२०त माजी कर्णधाराची घसरली जीभ, वापरले अभद्र शब्द

Virat-Kohli
---Advertisement---

कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात बुधवारी (१६ फेब्रुवारी) पहिला टी२० सामना (1st T20I) पार पडला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. दरम्यान, या सामन्यातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अभद्र भाषा बोलताना दिसत आहे. 

झाले असे की, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी ९ व्या षटकातील चौथ्या चेंडूला युजवेंद्र चहलने फ्लाईट दिली. त्यावर वेस्ट इंडिजचा फलंदाज रोस्टन चेसने पॅडल स्विप मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पॅडला लागला. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी पायचीतसाठी जोरदार अपील केले. मात्र, मैदानावरील पंचांनी हे अपील फेटाळत नाबाद दिले. त्यावर गोलंदाजी करणाऱ्या चहलने कर्णधार रोहितकडे डीआरएस रिव्ह्यू घेण्यासाठी मागणी केली.

त्यामुळे डीआरएस घेण्याचा निर्णय होत असताना विराट आपले मत देताना मजेच्या मूडमध्ये होता. त्याने त्याच मूडमध्ये असभ्य शब्दांचा वापर केला. त्याला म्हणायचे होते की, चेंडू चेसच्या नितंबाला लागला आहे. त्याचे हे वाक्य स्टंपमाईकमधून सर्वांना ऐकू गेले. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओही काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला Kohli using foul language).

दरम्यान, रोहितने डीआरएस रिव्ह्यू घेतला. मात्र, त्यात चेस बाद नसल्याचेच दिसले. त्यामुळे भारताला एक डीआरएस रिव्ह्यू गमवावा लागला.

https://twitter.com/Johnnysar77/status/1493956989197553664

भारताने जिंकला पहिला सामना
भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला २० षटकांत ७ बाद १५७ धावांवर रोखले होते. भारताकडून हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तर वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. त्याबरोबर काईल मायर्सने ३१ आणि कर्णधार कायरन पोलार्डने २४ धावांची खेळी केली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने ४ विकेट्स गमावत १८.५ षटकात १५८ धावांचे आव्हान पूर्ण केले आणि सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४० धावा केल्या. तसेच इशान किशनने ३४ धावा केल्या. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने ३४ आणि वेंकटेशन अय्यरने २४ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘अभी मजा आयेगा ना भिडू..’,श्रेयसला केकेआरचे कर्णधारपद मिळताच चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रीया

आयपीएल स्पर्धेच्या लिलावात धोनीच्या राज्यातील खेळाडू सर्वात पुढे, केली इतक्या कोटींची कमाई

‘पदार्पणवीर’ बिश्नोईने तर विक्रम केलेच, पण रोहितनेही ‘हे’ कारनामे करत पाकिस्तानी खेळाडूंना पछाडलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---