इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना शुक्रवार रोजी (१६ सप्टेंबर) पार पाडला. दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ही लढत झाली. २७ धावांनी हा सामना जिंकत चेन्नईने त्यांचे चौथे आयपीएल जेतेपद पटकावले आहे. परिणामी कोलकाता संघ यंदाचा उपविजेता ठरला आहे. यासह त्यांनी आयपीएलमधील एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पराभवास सामोरे गेल्यामुळे कोलकाता संघाला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. यासह कोलकाता संघ गुणतालिकेतील प्रत्येक स्थानावर विराजमान होणारा पहिला संघ बनला आहे. आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात १-८ या प्रत्येक स्थानावर त्यांचा प्रवास संपला आहे.
आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात कोलकाताला प्लेऑफमध्ये धडक मारता आली नव्हती. या हंगामात हा संघ सहाव्या स्थानावर राहिला होता. त्यापुढील हंगामात तर त्यांचे प्रदर्शन खालावल्याचे दिसले होते. आयपीएल २००९ मध्ये कोलकात्याला गुणतालिकेत आठव्या स्थानापर्यंतच मजल मारता आली होती. पुढे २०१० मध्ये आपल्या प्रदर्शनात सुधार करत त्यांनी सहाव्या स्थानावर त्यांचा या हंगामातील प्रवास संपवला होता.
आयपीएलचे पहिले ३ हंगाम प्लेऑफमध्येही पात्र ठरू न शकलेल्या कोलकात्याने २०११ मध्ये मात्र चौथ्या स्थानावर उडी घेत प्लेऑफ गाठले होते. परंतु त्यांना प्लेऑफ सामन्यांमध्ये विशेष खेळ दाखवता आला नव्हता. मात्र याच प्रदर्शनाची कसर त्यांनी २०१२ मध्ये भरुन काढली आणि त्यांचे आयपीएलमधील पहिलेवहिले विजेतेपद पटकावले होते. त्यापुढील हंगामात (२०१३) ते सातव्या स्थानावरच राहिले होते. परंतु पुन्हा दमदार पुनरागमन करत त्यांनी आयपीएल २०१४ मध्ये दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली होती.
Kolkata Knight Riders becomes the first team to finish at every position from 1-8 at end of an IPL season.
Champions in 2012, 2014
Runners-up in 2021
3rd in 2017, 2018
4th in 2011, 2016
5th in 2015, 2019, 2020
6th in 2008, 2010
7th in 2013
8th in 2009#IPL2021— Kausthub Gudipati (@kaustats) October 15, 2021
एका वर्षाच्या अंतराने असे २ वेळा चषकावर नाव कोरल्यानंतर आतापर्यंत कोलकाताने ४ वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. परंतु जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली आहे. २०१५ मध्ये पाचव्या, २०१६ मध्ये चौथ्या, २०१७ मध्ये तिसऱ्या, २०१८ मध्येही तिसऱ्या आणि २०१९ व २०२० मध्ये पाचव्या स्थानावर कोलकाताचा संघ राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021: राजस्थान रॉयल्सने यंदा ‘फेअरप्ले अवॉर्ड’वर कोरले नाव; पाहा आजपर्यंतचे विजेते संघ