केवळ भारतातच नाही तर जगतील जवळपास सर्वच देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक क्रिकेटपटूही अडकले आहेत. यात कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या नितीश राणाचाही समावेश होता. पण आता त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. याबद्दल केकेआर संघाने माहिती दिली आहे.
केकेआरने दिलेल्या माहितीनुसार ‘नितीशने १९ मार्चला कोरोना चाचणी केली होती. ज्यात तो निगेटिव्ह आढळला होता. त्यानंतर तो २१ मार्चला केकेआरचा संघ थांबलेल्या मुंबईतील हॉटेलमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर आयपीएलच्या नियमानुसार तो क्वारंटाईनमध्ये असताना त्याची २२ मार्चला पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.’
तसेच केकेआरने पुढे माहिती दिली आहे की ‘त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. पण आयपीएलच्या नियमानुसार त्याने स्वत:ला एकांतवासात ठेवले. त्यानंतर गुरुवारी त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि आम्हाला आनंद आहे की त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की तो लवकरच संघासह सरावाला सुरुवात करेल आणि हंगाम सुरु होण्यापूर्वी पुर्णपणे तंदुरुस्त असेल.’
माध्यमांतील वृत्तांनुसार राणा गोवामध्ये सुट्टींतील कालावधी घालवल्यानंतर केकेआर संघात सहभागी होण्यासाठी आला होता.
#KKR statement on @NitishRana_27 ⤵️https://t.co/qScQtx8pHy
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2021
आयपीएल २०२१ मधील केकेआरचा पहिला सामना ११ एप्रिलला
आयपीएल २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. केकेआर आयपीएल २०२१ हंगामात त्यांचे पहिले ३ साखळी फेरीचे सामने चेन्नईमध्ये खेळणार आहे. त्यानंतरचे साखळी फेरीतील २ सामने मुंबईमध्ये होतील, तर त्यानंतर केकेआरचे अहमदाबादला ४ आणि बेंगलोरला ५ साखळी फेरीतील सामने होणार आहेत. केकेआरचा पहिला सामना ११ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
नितीश राणाची आयपीएलमधील कामगिरी
नितीश राणाची आत्तापर्यंतची आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने आयपीएलच्या १३ व्या हंगामात १४ सामन्यांत ३५२ धावा केल्या होत्या. यात ३ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच राणाने आत्तापर्यंत ६० आयपीएल सामने खेळले असून ११ अर्धशतकांसह १४३७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीने ‘अंपायर्स कॉल’ हटवण्यास दिला नकार, क्रिकेट समीती प्रमुख अनिल कुंबळेने सांगितले कारण
आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला! टी नटराजनला मिळाली थार, त्यानेही पाठवले ‘हे’ खास रिटर्न गिफ्ट
“आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकून कोणावर उपकार केले नाहीत”, गौतम गंभीरचे खळबळजनक भाष्य