आयपीएल 2024 चा हंगाम खूपच रोमांचक राहिला आहे. या हंगामात अनेक चढ-उतार दिसून आले. आयपीलचा शेवटचा टप्पा आजपासून सुरु होत आहे. प्लेऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पहिला क्वालिफायर सामना आज 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना कोलकाता विरुद्ध हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. जो संघ बाजी मारेल तो संघ फानलमध्ये प्रवेश करेल.
आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये आतापर्यंत केकेआर आणि हैदराबाद तीन वेळा आमने-सामने आले आहेत. आज चौथ्या वेळेस हे दोन संघ एकमेकांशी भिडतील. प्लेऑफमध्ये हैदराबादची कामगिरी केकेआर पेक्षा उत्तम राहिली आहे. या हंगामात केकेआरनं अपल्या अष्टपैलू कामगिरीनं धुमाकूळ घातला आहे, तर हैदराबादनं देखील फलंदाजीच्या जोरावर अनेक रेकाॅर्ड त्यांच्या नावावर केले. त्यामुळे आज दोघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळू शकतो.
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि हैदराबाद हे संघ 26 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये कोलकाताने 16 तर हैदराबादनं 9 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना अनिर्णित राहिला. कोलकाता विरुद्ध हेदराबाद शेवटचा सामना ईडन गार्डन्सवर खेळला गेला होता. त्यामध्ये केकेआरने हेदराबादला 4 धावांनी पराभूत केलं होतं. दोन्ही संघ याआधी प्ले-ऑफ मध्ये 3 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. त्यामध्ये काेलकाताने 1 तर हेदराबादनं 2 सा्मने जिंकले आहेत. दोन्ही संघ अखेरचे प्ले-ऑफमध्ये 2018 साली भिडले होते. त्यावेळी हेदराबादनं केकेआरचा 14 धावांनी धुव्वा उडवला होता.
कोलकातानं आतापर्यंत प्ले ऑफमध्ये 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी 8 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर हेदराबादनं प्ले ऑफमध्ये 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी 5 सामने जिंकलेत तर 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
या हंगामात केकेआरकडून अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने 13 सामन्यांमध्ये 182.93च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 461 धावा कुटल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने 13 सामन्यात 18 बळी घेतले आहेत. हैदराबादसाठी ट्रेविस हेडने 201.13च्या स्ट्राईक रेटने 533 धावा ठोकल्या आहेत. तर वेगवान गोलंदाज टी-नटराजनने 17 बळी घेतले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! यावर्षी हैदराबाद बनणार चॅम्पियन! आयपीएल 2016 अन् आयपीएल 2024 मध्ये ‘या’ गोष्टी आहेत समान
टीम इंडियाचा हेड कोच निवडण्यात धोनीची भूमिका ठरणार महत्त्वाची! बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी






