पुणे । एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ यांचा सुपरटायब्रेकमध्ये 7-6(3), 6-7(5), 10-7 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत दुहेरीत 1तास 49मिनिटे चाललेल्या या सामन्यात सुरुवातीला दोन्ही जोड्यांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यानंतर तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ यांनी भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन यांची पाचव्या, तर भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ जोडीची सहाव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 6-6 अशी बरोबरी निर्माण झाल्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला.
टायब्रेकमध्ये भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने आपले वर्चस्व राखत हा सेट तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ जोडीविरुद्ध 7-6(3)असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ जोडीने भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन जोडीची 4थ्या गेममध्ये ब्रेक केली व हा सेट टायब्रेकमध्ये 7-6(5)असा जिंकून बरोबरी साधली. सुपरटायब्रेकमध्ये भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ जोडीचा 10-7असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या जोडीला 3100डॉलर व 80एटीपी गुण, तर उपविजेत्या जोडीला 1800डॉलर व 48एटीपी गुण देण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक व पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव व स्पर्धा संचालक सुंदर अय्यर, केपीआयटीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सोनसळे, एमएसएलटीएचे खजिनदार सुधीर भिवापुरकर, पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, एटीपी सुपरवायझर अँड्री कॉर्निलव, आदी मान्यवर उपस्थित होते.
दुहेरी गट: अंतिम फेरी:
एन विजय सुंदर(भारत)/रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.हसीह चेंग पेंग(तैपेई) यांग सुंग हुआ(तैपई) 7-6(3), 6-7(5), 10-7