टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रविवारी (५ सप्टेंबर) भारताच्या पॅरा-ऍथलीट्सनी बॅडमिंटनमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. कृष्णा नागरने आज पुरुष एकेरीच्या एसएच६ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. हाँगकाँगच्या चू मन काईविरुद्ध खेळलेल्या या अंतिम सामन्यात नागरने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. नागरने अंतिम सामन्यात २१-१७, १६-२१, २१-१७ ने विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले.
उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कोम्ब्सचा पराभव करणाऱ्या कृष्णा नागरला या सामन्यात सुवर्णपदकाचे दावेदार मानले जात होते. दुसऱ्या क्रमांकाच्या नागरने देशवासियांना निराश केले नाही आणि पहिल्या सेटमध्ये शानदार सुरुवात केली. हाँगकाँगच्या खेळाडूने त्याला चांगले आव्हान दिले आणि पहिल्या सेटच्या एका टप्प्यावर नगर ११-१६ ने मागे होता. मात्र, यानंतर नागरने दमदार पुनरागमन करत स्कोर १५-१७ केला. यानंतर नगरने सलग सहा गुण मिळवत पहिला सेट २१-१७ असा जिंकला. तसेच या सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.
कृष्णा नागरविरुद्धच्या दुसऱ्या सेटमध्ये हाँगकाँगच्या चू मन काईने पुनरागमन करत ७-११ अशी आघाडी घेतली. त्यानंतर नागरने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि स्कोर १३-१७ केला. मात्र, काईने शेवटी नागरला एकही संधी दिली नाही आणि सेट १६-२१ असा करून सामना १-१ असा बरोबरीत आणला.
अंतिम आणि निर्णायक सेटमध्ये कृष्णा नागरने सुरुवातीपासूनच चांगला खेळ खेळला आणि काईवर ५-१ अशी आघाडी घेतली. एका वेळी नगर १३-८ ने आघाडीवर होता आणि त्याच्या हातात सुवर्णपदक दिसत होते. मात्र, काईने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आणि सलग पाच गुण घेत स्कोअर १३-१३ अशी बरोबरीत आणले.
नागरला तिसऱ्या सेटमध्ये १७-१६ च्या स्कोअरसह थोडी आघाडी मिळाली होती. असे वाटत होते की हा सामना कोणत्याही बाजूने झुकू शकतो. इथेच नागरने आपला सर्वोत्तम खेळ दाखवला आणि सलग चार गुण मिळवत २०-१६ अशी आघाडी घेतली. सरतेशेवटी, नागरने विजयी गुण मिळवत तिसरा सेट २१-१७ जिंकला. तसेच, २-१ च्या फरकाने हे सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
#IND's National Anthem played today @Krishnanagar99 's #Gold Victory Ceremony #ParaBadminton Men's Singles SH6, he defeats CHU Man Kai(HGK) @ #Tokyo2020 #Paralympics#JaiHind #WeThe15@narendramodi @ianuragthakur @Media_SAI @KotakBankLtd @centralbank_in @UnionBankTweets pic.twitter.com/Z0iBlC9AG8
— Paralympic India 🇮🇳 (@ParalympicIndia) September 5, 2021
टोकियोमध्ये भारताचे हे आतापर्यंतचे पाचवे सुवर्णपदक आहे. तसेच, बॅडमिंटन खेळात या पॅरालिम्पिकमधील हे देशातील दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा प्रमोद भगत याने पुरुष एकेरीत एसएल ३ प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. दुसरीकडे, नोएडाचे जिल्हाधिकारी सुहास एल यथिराज यांनीही पुरुष एकेरीच्या एसएल ४ स्पर्धेत रौप्य पदक पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या –
शिक्षकदिन! आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास
ऑस्ट्रेलियाचे घातक गोलंदाज शॉन टेट भारताच्या ‘या’ रणजी संघाला देणार प्रशिक्षण
शेरास सव्वाशेर! पंतने केलेल्या चेष्टेला शमीकडून तोडीस तोड उत्तर, जाडेपणाची करुन दिली आठवण