भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णप्पा गौतम यंदा आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना दिसणार आहे. भारतातील कर्नाटक राज्यातील खेळाडूंनी भरलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब संघात गौतमच्या रुपात अजून एका कर्नाटकच्या खेळाडूची भर पडली आहे. त्यामुळे पंजाब संघात आता कर्नाटकचे एकूण ५ खेळाडू उपलब्ध आहेत. याविषयी बोलताना गौतमने मोठे विधान केले आहे.
गौतम म्हणाला की, किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये कर्नाटकचे ५ खेळाडू असल्यामुळे त्यांच्या संघाला खूप फायदा होणार आहे. या खेळाडूंनी सोबत रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे ते एकमेकांना व्यवस्थित समजून घेतात. त्यांच्या या गोष्टीचा मैदानावर खूप उपयोग होणार आहे. Krishnappa Gowtham Statement About Kings XI Punjab Having 5 Karnataka Players
गौतमला किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएल २०२०साठी राजस्थान रॉयल्सकडून प्लेअर ट्रेडींग मार्फत आपल्या संघात सामाविष्ट केले होते. गौतमव्यतिरिक्त किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल हा कर्नाटकचा आहे. तर, संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे हेदेखील कर्नाटकचे आहेत. करुण नायर आणि मयंक अगरवाल यांनीही कर्नाटककडून क्रिकेट खेळले आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर बोलताना गौतम म्हणाला की, “या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबशी जोडला गेल्यामुळे मी खूप उत्साही आहे. या संघाचा भाग असण्यापेक्षा अजून दूसरी कोणतीच गोष्ट माझ्यासाठी मोठी असू शकत नाही. त्यातही कर्नाटकचे ५ खेळाडू आमच्या संघात असणे ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही सोबत रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये कित्येक सामने खेळले आहेत. तर, काही खेळाडूंच्या विरुद्ध खेळण्याचाही आम्हाला अनुभव आहे.”
यंदा किंग्स इलेव्हन पंजाब हा संघ खूप दमदार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची शानदार संधी असल्याचे गौतमने सांगितले आहे.
पुढे बोलताना गौतम म्हणाला की, “पुढील २ ते अडीच महिने किंग्स इलेव्हन पंजाब हा संघच माझे कुटुंब आहे. मी सर्वांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्याकडून जेवढे होतील, तेवढे संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्याबरोबरच माझ्यासोबत असा दमदार संघ असल्यामुळे आमच्याकडे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.”
गौतमने आतापर्यंत आयपीएलमध्ये २२ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १४४ धावा आणि १२ विकेट्स चटकावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटमध्ये चुकीच्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला केकेआरचा कर्णधार म्हणतो योग्य, पण…
‘हा’ दिग्गज ऑस्ट्रेलियन झाला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक; करणार पाँटिंग, कैफसह कोचिंग
राजवाड्यासारखे आहे रैनाचे घर, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्
ट्रेंडिंग लेख –
टी२०मधील स्टार खेळाडू, पण राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ठरले सुपर डुपर फ्लॉप
हे ५ क्रिकेटर आता खेळताय फक्त एक क्रिकेटर म्हणून, भविष्यात होणार आपल्याच संघाचे कर्णधार
किचनमधील धुरामुळे झाला होता राडा, चालू क्रिकेट सामन्यात अग्निशामक दल घुसले मैदानात