---Advertisement---

अर्धशतक झळकवल्यावर पंड्या आणि राहुलचे खास सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, मार्च 23, 2021 7:15 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून यजमान भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या डावात फलंदाजी करताना भारताने ५० षटकात ३१७ धावा उभारल्या.

यात शिखर धवनच्या ९८ धावांचा महत्वाचा वाटा तर होताच. त्याशिवाय कृणाल पंड्या आणि केएल राहुलने डावाच्या शेवटी फटाक्यांची आतिषबाजी करत भारताची धावसंख्या ३०० पार नेली. या डावानंतर कृणाल पंड्या आणि केएल राहुलच्या अर्धशतकानंतरच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

कृणाल-राहुलची शतकी भागीदारी 

भारताच्या डावाची सुरुवात तशी दमदार झाली होती. रोहित शर्मासह ६४ धावांची सलामी दिल्यानंतर शिखर धवनने कर्णधार विराट कोहलीसह दुसर्‍या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली होती. मात्र कोहली बाद झाल्याने ही जोडी फुटली आणि त्यानंतर भारताने थोड्याच काळाच्या अंतरात लवकर विकेट्स गमावल्या. ४१व्या षटकांत भारताची ५ बाद २०५ अशी अवस्था होती. त्यावेळी भारतीय संघ ३०० धावांपर्यंत पोहोचणार नाही, असाच अंदाज होता.

मात्र केएल राहुलने कृणाल पंड्याला साथीला घेत हा अंदाज खोटा ठरवला. त्यांनी शेवटच्या १० षटकांत तब्बल ११२ धावा जोडत भारताची धावसंख्या ३१७ पर्यंत नेली. या दरम्यान दोघांनीही आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. याच सेलिब्रेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

कृणालचे विक्रमी अर्धशतक
आजच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्यासाठी हे अर्धशतक खास ठरले. पदार्पणात सातव्या क्रमांकावर येत अर्धशतक ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. फलंदाजीत कमाल केल्यानंतर आता गोलंदाजीतही त्याची पुनरावृत्ती करत भारताला सामना जिंकवून देण्याचा कृणाल प्रयत्न करेल.

महत्वाच्या बातम्या:

INDvsENG 1st ODI: धवनचे शतक हुकले, पदार्पणवीर कृणाल पंड्याचे वादळी अर्धशतक; इंग्लंडला विजयासाठी ३१८ धावांची गरज

अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी

विराट कोहलीने वनडेमध्ये रचला इतिहास; मायदेशात सर्वात कमी डावात १० हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---