आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17 वर्षांनंतर पहिले विजेतेपद पटकावले. आरसीबीने संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी केली. ज्यामुळे त्यांनी शेवटी ट्रॉफी जिंकली. बेंगळुरूच्या सर्व खेळाडूंनी अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी या सामन्याचा खरा हिरो कृणाल पांड्या होता. या सामन्यात पांड्या फलंदाजीने काही खास कामगिरी करू शकला नाही, परंतु गोलंदाजी करताना त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
अंतिम सामन्यात, कृणाल पांड्याने त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 17 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्याने जोस इंग्लिस आणि प्रभसिमरन सिंग सारख्या धोकादायक खेळाडूंना बाद केले. या शानदार कामगिरीसाठी त्याने सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
AAAAARRRRR CEEEEEEE BEEEEEE ❤????#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/lp3AwgCVQl
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
The man for the ???????????? ???????????????????? ????@krunalpandya24 becomes the 1️⃣st player to deliver TWO Player of the Match performances in #TATAIPL finals ????
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
He guides #RCB to a maiden title ????
Relive his spell ▶ https://t.co/vNWU7vQF06 #RCBvPBKS | #Final | #TheLastMile pic.twitter.com/0B4LMWCJc0
कृणाल पांड्याने हा पुरस्कार जिंकून एक नवा इतिहास रचला आहे. पांड्या आयपीएलच्या इतिहासात दोन अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, त्याने 2017च्या आयपीएल अंतिम सामन्यातही सामनावीप पुरस्कार जिंकला होता. त्या हंगामाचा अंतिम सामना रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला होता.
आयपीएल 2025 मधील कृणाल पंड्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने या हंगामात 15 सामने खेळले. फलंदाजीत, त्याने 15 सामन्यांपैकी 7 डावात 109 धावा केल्या, ज्यात त्याचा सर्वोच्च धावसंख्या 73 नाबाद होती. गोलंदाजीत, त्याने 15 सामन्यांमध्ये 22.29 च्या सरासरीने 17 बळी घेतले.या हंगामात त्याने अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि संघाच्या विजयात योगदान दिले. अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाब 20 षटकांत फलंदाजी केल्यानंतर 7 गडी गमावून फक्त 184 धावा करू शकला.






