इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिराती येथे सुरु आहे. सध्या स्पर्धेत सर्वच संघात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चांगलीच चूरस दिसून येत आहे. दरम्यान, अनेक खेळाडूंसह त्यांचे कुटुंबिय देखील युएईमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच हार्दिक पंड्याचा दीड वर्षीय मुलगा अगस्त्यचा देखील एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
अगस्त्यने काकाला बरोबर ओळखले
अगस्त्यचा एक व्हिडिओ त्याचा काका म्हणजेच हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हार्दिक आणि कृणाल हे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहेत.
कृणालने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की अगस्त खेळण्याच्या मूडमध्ये आहे. यावेळी त्याच्यासमोर मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंचे फोटो असलेले मोठे पोस्टर आहे. तसेच व्हिडिओमध्ये कृणालचा आवाज येत आहे. तो अगस्त्यला विचारत आहे की त्या पोस्टरवर केपी (कृणाल पंड्या) कुठे आहे? या प्रश्नानंतर अगस्त्य ते पोस्टर पाहातो आणि कृणालच्या फोटोसमोर जाऊन त्याला हात लावतो. यावर कृणालही अगस्त्यचे कौतुक करतो.
या व्हिडिओला कृणालने कॅप्शन दिले आहे की ‘माय बॉल ऑफ लव्ह (माझ्या प्रेमाचा बॉल).’ हाच व्हिडिओ मुंबई इंडियन्सने देखील शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CUaYvWmByAE/
कृणालने शेअर केलेल्या व्हिडिओवर त्याची पत्नी पंखुडी शर्मा, तसेच हार्दिकची पत्नी आणि अगस्त्यची आई नताशा हिने देखील कमेंट केली आहे. पंड्या कुटुंबिय नेहमीच एकमेकांचे मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात.
Bravooo Agastya! 💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #KhelTakaTak @hardikpandya7 @krunalpandya24 @MXTakaTak MI TV pic.twitter.com/o0DFqGzRPE
— Mumbai Indians (@mipaltan) September 30, 2021
पंड्या बंधू करतायेत संघर्ष
सध्या हार्दिक आणि कृणाल हे दोघेही आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चांगल्या कामगिरीसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. हार्दिकने फलंदाजीत पंजाब किंग्सविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. पण, तो अजूनही गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे, मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघासमोरील चिंता वाढत आहे. कारण हार्दिकचा आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे.
तसेच कृणालही फारसा फॉर्ममध्ये नाही. त्यालाही फलंदाजी आणि गोलंदाजीत छाप पाडण्यात अपयश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादच्या ३ फलंदाजांचे झेल पकडत धोनीचा सीएसकेसाठी ‘मोठा’ किर्तीमान, पार केला मैलाचा दगड
महिला कसोटी क्रिकेट व पुरुष कसोटी क्रिकेटमधील ‘हे’ सात फरक तुम्हाला माहितच हवेत!
“आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच राहिले नाही, आता आम्ही अजून खुलून खेळू शकतो”