22 जानेवारीला अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित केली जात आहे. या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, कपिल देव आणि सुनील गावस्कर या क्रिकेटपटूंना आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचवेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, केएस भरतने इंग्लंड लायन्सविरुद्ध शानदार शतक झळकावले. या शतकानंतर त्याने खास पद्धतीने सेलिब्रेशन केले.
केएस भरत यानी आपले शतक भगवान श्री राम यांना समर्पित केले आणि धनुष्यबाण ओढला. केएस भरतने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून व्हिडिओ शेअर केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
View this post on Instagram
त्याचवेळी, केएस भरतच्या शतकामुळे भारतीय संघाने इंग्लंड लायन्सविरुद्धचा पहिला अनधिकृत कसोटी सामना अनिर्णित ठेवला. लढाऊ शतक झळकावल्यानंतर भरतने चाहत्यांकडे बॅट दाखवत धनुष्यबाण चालवला. या यष्टीरक्षक फलंदाजाने 165 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 116 धावा केल्या. याशिवाय तिसऱ्या दिवशी नाईट वॉचमन म्हणून आलेल्या मानव सुथारने 254 चेंडूत नाबाद 89 धावांची संस्मरणीय खेळी केली. (KS Bharat celebrated a century dedicated to Lord Rama the video of the special celebration of the century is going viral on social media)
हेही वाचा
शोएब अख्तरचं विराटबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘तो आमच्या वेळी असता तर…’
Ram Mandir । प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एक दिवस आधीच विराट अयोध्येत दाखल, सचिन आणि जडेजाबाबत मोठी अपडेट