भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुखापग्रस्त असल्याने केएस भरत याला संधी मिळत आहे. भरतला भारतीय संघ व्यवस्थापनाने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी निवडले आहे. 7 ते 11 जूनदरम्यान डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. या महत्वाच्या सामन्याआधी भरतने मोठा खुलासा केला.
नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग 20223 (IPL 2023) मध्ये यष्टीरक्षक यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत आणि भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी यांच्यात चर्चा झाली होती. भरतने दिलेल्या माहितीनुसार आगामी डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी त्याला धोनीकडून खास मार्गदर्शन मिळाले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार भरत म्हणाला, “नुकतीच आयपीएलदरम्यान धोनीशी माझी चर्चा झाली. त्यांनी इंग्लंडमध्ये यष्टीरक्षणाच्या आपल्या अनुभवाविषयी सांगितला. सोबतच यष्टीरक्षकासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय असते, हेदेखील सांगितले. चांगली चर्चा झाली आणि खूपकाही माहीत पडले.”
दरम्यान, आयपीएल 2023 साठी गुजरात टायटन्सने केएस भरतला आपल्यासोबत डोले होते. पण संघात अनुभवी रिद्धिमान सहा असल्यामुळे भरतला यावर्षी एकही आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये. आयपीएल 2023 साठी डिसेंबर 2022 मध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. त्यात भरतला 1.20 कोटी रुपयांमध्ये गुजरातने खरेदी केले होते. सोबतच भरतने यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याला मालिकेतील चारही सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि 101 धावांचे योगदान त्याने दिले. 44 ही मालिकेतील भरतची सर्वोत्तम खेळी होती.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, केएस भरत (यष्टीरक्षक), शुबमन गिल, रविंद्र जडेजा, विराट कोहली, ईशान किशन, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट, उमेश यादव.
राखीव खेळाडू – यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
(KS Bharat gets special advice from MS Dhoni for WTC finals during IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कसं खेळावं हे त्याला सांगण्याची गरज नाही…’, WTC फायनलपूर्वी बोलला रोहित शर्माची
WTC Final । केव्हा आणि कुठे पाहणार भारत-ऑस्ट्रेलियातील थरार? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही