वेस्ट इंडिजविरुद्ध पाच टी20 सामन्यांच्या मालिकेत तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय प्राप्त केला. याआधी झालेल्या दोन सामन्यात भारताने दोन्ही सामने गमावले होते. मात्र, तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवची तुफानी फलंदाजी आणि कुलदीप यादवच्या खरतनाक गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिज संघाचा मेळ लागला नाही. वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केल्यानंतर टी20 सामन्यातही कुलदीप आपल्या गोलंदाजीची जादू पसरवत आहे.
दुखापतीमुळे कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळू शकला नाही. यानंतर तिसऱ्या सामन्यात पूर्णपणे तंदुरुस्त पुनरागमन करुन त्याने त्याच्या गोलंदाजीची उत्कृष्ट शैली दाखवली. तिसऱ्या टी20 सामन्यात कुलदीपने गोलंदाजी करत 4 षटकांत 3 विकेट घेतल्या. या सामन्यात कुलदीपने जॉन्सन चार्ल्स, ब्रँडन किंग आणि निकोलस पूरन यांना आपला बळी बनवले. सोबतच तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट पूर्ण करण्यात यशस्वी झाला.
भारतीय संघासाठी आतापर्यंत 30 टी20 सामने खेळलेल्या कुलदीपने 14.28 च्या सरासरीने 50 विकेट घेतल्या आहेत. यासोबत तो भारतीय संघासाठी टी20 प्रकारात सर्वात वेगवान 50 विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. याआधी हा विक्रम फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) च्या नावावर होता. त्याने 2019मध्ये आपल्या 34व्या टी20 सामन्यात 50 बळी घेतले होते.
2023 मध्ये कुलदीपची वनडे प्रकारात चमकदार कामगिरी
वनडे प्रकारात 2023 मध्ये कुलदीपची चेंडूसोबत अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. तो संघासाठी सामना जिंकणारा गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. कुलदीपने या वर्षात आतापर्यंत 11 सामन्यात 17.18 च्या सरासरीने 22 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने एकाच सामन्यात 4 विकेटही घेतल्या आहेत.
कुलदीपची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
28 वर्षीय कुलदीपने वनडेमध्ये 84 सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत. तसेच 30 टी20 सामन्यात त्याने 50 बळी घेतले आहेत.
यासोबत कसोटी प्रकारात गोलंदाजाने 14 डावात 34 विकेट घेतल्या आहेत. ( kuldeep yadav becomes fastest indian bowler to complete 50 wickets in just 30 matches for t20i cricket)
महत्वाच्या बातम्या-
पदार्पणाच्या मालिकेत चमकला तिलक! ‘असा’ पराक्रम करत थेट सूर्याची केली बरोबरी
वर्ल्डकपपूर्वी युवराजचे विचार करायला भाग पाडणारे विधान; म्हणाला, ‘रोहित चांगला कर्णधार, पण…’