भारताचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याचा आज वाढदिवस आहे. भारताचा हा युवा गोलंदाज आज २७व्या वर्षात पदार्पण करत आहे. याच निमित्ताने क्रिकेट जगतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कुलदीपच्या संघ सहकाऱ्यांसह बीसीसीआय आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाने देखील त्याच्या वाढदिवसानिमित्त ट्विट केले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कुलदीपने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध घेतलेल्या हॅट्रिकचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये कुलदीपने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांतील दुसरी हॅट्रिक नोंदवली होती.
88 intl. caps 🧢
168 intl. wickets ☝️
Fastest Indian spinner to 100 ODI wickets 👌
First Indian to take two hat-tricks in international cricket 🔥Wishing #TeamIndia's @imkuldeep18 a very happy birthday 🎂👏👏
Let's relive his hat-trick against West Indies 📽️👇
— BCCI (@BCCI) December 14, 2020
“आमचा भरवशाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आज २६ वर्षांचा होत आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असे कॅप्शन देत आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने कुलदीपला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Our very own spin machine turns 26 today 🎉
Wishing @imkuldeep18 a very #HappyBirthday. Keep shining! #KKR #Kuldeep pic.twitter.com/ug3Wn3bZNy
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 14, 2020
कुलदीपचा भारतीय संघातील फिरकी पार्टनर युझवेंद्र चहल याने देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लहान भावा. तुला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू देत”, असे ट्विट चहलने केले आहे.
https://www.instagram.com/p/CIw9up-hl3H/
कुलदीपचा भारतीय संघ आणि उत्तर प्रदेश रणजी संघातील सहकारी सुरेश रैना याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत या चायनामन फिरकी गोलंदाजाला शुभेच्छा दिल्या. “तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुलदीप. हा दिवस आणि येणारे वर्ष देखील तुझ्यासाठी खास ठरो”, अशी कॅप्शन रैनाने आपल्या पोस्टला दिली आहे.
https://www.instagram.com/p/CIw3lIthyL8/?utm_source=ig_embed
सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात कुलदीपचा समावेश आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेत कुलदीपला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे येत्या कसोटी मालिकेत त्याला कशी संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.