---Advertisement---

आयपीएलसाठी या भारतीय खेळाडूची जोरदार तयारी…..

On: शुक्रवार, मार्च 6, 2020 5:09 PM
---Advertisement---

29 मार्च पासून सुरु होत असलेल्या आयपीएल 2020 च्या हंगामामध्ये चांगले प्रदर्शन करून निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी अनेक भारतीय खेळाडू उत्सुक असतील. त्यातीलच एक म्हणजे चायनामन गोलंदाज कुलदीप यादव.

18 ऑक्टोबर पासून पुरुष टी20 विश्वचषक सुरू होत आहे. त्यात संधी मिळावी म्हणून कुलदीप यादव जोरदार प्रयत्न करत आहे. त्याला मागील काही दिवसात खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर रहावे लागले आहे.

याबद्दल पीटीआयशी बोलताना कुलदीप म्हणाला कि ‘मला वाटत नाही की काही चुकीचे झाले आहे. तो एक  संघ संयोजनाचा भाग आहे. न्यूझीलंडमध्ये खेळपट्टी वेगळी होती. आपण पाहिले की कसोटीमध्ये जरा पण फिरकीला मदत करणारी खेळपट्टी नव्हती. त्याशिवाय ही कसोटी मालिकासुद्धा लहानच होती.’

तो पुढे असं बोलला की, ‘रवी भाई (शास्त्री) हे मला नेहमीच पाठिंबा देत होते. मी आत्तापर्यंंत जेवढं क्रिकेट खेळलेलो आहे त्यात मला कायमच त्यांनी मार्गदर्शन केले आहे. परिस्थिती बघता हा संघाचा निर्णय होता.’

कुलदीप कसोटीचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरूध्द जानेवारी 2019 मध्ये खेळला आहे. तर शेवटचा T20 सामना याचवर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेविरूध्द खेळला आहे. तो न्यूझीलंड दौऱ्यामध्ये फक्त 1 वनडे सामना खेळला आहे. 

29 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल बद्दल तो म्हणाला, ‘आयपीएल हा एक असा मंच आहे जो दर वर्षी बदलतो आणि त्यासाठी तुम्हाला नेहमी तयार राहावं लागतं. मी यावर्षी आयपीएलसाठी पूर्णपणे तयार आहे.’

कुलदीप यावर्षी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

असं काय केलं की एकाच संघातील ते दोघेही ठरले सामनावीर पुरस्कारचे मानकरी

धोनीबद्दलचा ‘तो’ प्रश्न ठरला निवडकर्त्यांच्या मुलाखतीत महत्त्वाचा

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याआधी सौराष्ट्रासाठी ही आहे सर्वात मोठी बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---