---Advertisement---

गेल्या आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेला भारतीय यावेळी धमाका करायला सज्ज

On: बुधवार, सप्टेंबर 16, 2020 3:51 PM
---Advertisement---

आयपीएल २०१९ चा हंगाम कुलदीप यादवसाठी फार चांगला गेला नव्हता. मागील हंगामात त्याला ९ सामन्यांत ४ फक्त बळी घेता आले. परंतू, कोलकाता नाइट रायडर्सला कुलदीप यादवचे मूल्य काय आहे हे माहित आहे. आयपीएलच्या या हंगामासाठी केकेआरला आपल्या या गोलंदाजावर खूप विश्वास आहे. मागील हंगामातील धडे घेऊन चायनामन गोलंदाज कुलदीप येणाऱ्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

नुकताच ‘क्रिकेट कनेक्स्टशी’ बोलताना कुलदीपने गेल्या हंगामातून काय धडे शिकला याबद्दल सांगितले. कुलदीप म्हणाला, असे वाटते की एखादा खराब दौरा खेळाडूसाठी सामान्य आहे. आपण नेहमीच चांगलं प्रदर्शन करू, असा विचार करू शकत नाही. आपण क्रिकेटपेक्षा मोठे नाही. आपण सामने खेळतो, परंतु आपण क्रिकेटपेक्षा मोठे होऊ शकत नाही. कधीकधी आपण चांगली कामगिरी करता, कधीकधी करत नाही. हा खेळाचा एक भाग आहे.

कुलदीप पुढे म्हणाला की, २०१९ अर्थातच वाईट होते. कारण मी चांगलं प्रदर्शन केलं नव्हतं. जर चांगली कामगिरी  केली असती तर वर्ष चांगलं गेलं असतं. म्हणूनच येथे चांगले आणि वाईट नेहमीच घडत असते.  २०१९ च्या हंगामापासून मी बरेच काही शिकले आणि भरपूर अनुभवही मिळविला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---