रांची। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 314 धावांचे आव्हान ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजाने दमदार फलंदाजी केली. फिंचने 93 तर ख्वाजाने 104 धावा केल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलनेही 47 धावांची छोटेखानी खेळी केली. मात्र या डावात कुलदीप यादवने बाद केलेल्या पिटर हँड्सकॉम्बच्या विकेटमुळे काही वाद निर्माण झाले आहेत.
झाले असे की कुलदीप यादवने 44 व्या षटकातील टाकलेल्या चौथ्या चेंडूवर हँड्सकॉम्बने फ्रंटफूटला येत फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तो चुकला. त्यामुळे चेंडू त्याच्या पॅडला लागला.
पण ज्यावेळी पंचांनी पायचीत आहे की नाही हे पाहण्यासाठी डीआरएस रिव्ह्यूची मदत घेतली. त्यामध्ये चेंडू लाइनमध्ये पडून सरळ मधल्या स्टंपवर जाताना दिसला. त्यामुळे हँड्सकॉम्बला बाद देण्यात आले.
पण यावर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या नुसार हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात होता. तरीही तो मधल्या स्टंपवर जाताना दिसला.
Is this the same technology that helped Sachin survive against Ajmal in Mohali? pic.twitter.com/ikvQRsE3mO
— Kalim Khan (@Kallerz37) March 8, 2019
तसेच काही चाहत्यांनी याची तुलना 2011 च्या विश्वचषकात मोहाली येथे झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यातील सईद अजमलने सचिन तेंडुलकरला बाद केलेल्या चेंडूशी केली आहे.
मात्र त्या सामन्यात पंचानी बाद दिल्यानंतरही डीआरएस रिव्यूमध्ये सचिन नाबाद असल्याचे दिसले होते. त्यावेळीही असाच प्रकार झाला होता. रिव्ह्यूमध्ये तो चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाताना दिसत होता. पण काहींचे म्हणणे होते की तो चेंडू स्टंपच्या दिशेने जायला हवा होता.
महत्त्वाच्या बातम्या –
–२०१९मध्ये विराटने वनडेत प्रत्येक दिवशी सरासरी केल्यात ७.४२ आंतरराष्ट्रीय धावा
–एबी डिविलियर्स, धोनी यांना मागे टाकत किंग कोहलीने केला विश्वविक्रम
–जाणून घ्या, रोहित शर्मा नक्की आउट होता की नाही…
–गेल्या ५ सामन्यातील भारतीय सलामीवीरांची कामगिरी पहाच
–१४ धावांवर बाद होऊनही हिटमॅन रोहित शर्माने केला हा मोठा कारनामा