---Advertisement---

‘कुल-चा’ जोडी एकत्र म्हणजे मजामस्तीची खात्री! विराट, धोनीची नक्कल करतानाचा व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यातील सामन्यांना १८ जुलै रोजी सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेत पोहचून १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले असल्याने सर्व खेळाडू एकमेकांमध्ये चांगले मिसळले आहेत. त्याचबरोबर बायोबबलमध्ये असल्याने सर्व खेळाडू एकत्रच आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या दौऱ्यातील विविध फोटो आणि व्हिडिओ सर्वांसमोर येत आहे.

नुकताच एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. त्यात भारताचे अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल वेगवेगळ्या भारतीय क्रिकेटपटूंची नक्कल करुन त्यांचे नाव ओळखण्याचा खेळ खेळताना दिसत आहेत.

कुलदीपने केली विराट, धोनीची नक्कल
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की युजवेंद्र चहलच्या हातात एक बोर्ड आहे, ज्यावर खेळाडूचे नाव लिहिलेले आहे. हा बोर्ड त्याने त्याच्या डोक्यावर धरला आहे. त्यामुळे त्याला खेळाडूचे नाव दिसणार नाही. कुलदीप त्या बोर्डवरील खेळाडूचे नाव वाचून त्याची नक्कल करुन दाखवतो. त्यावरुन चहल बोर्डवर कोणत्या खेळाडूचे नाव लिहिले आहे, ते ओळखतो.

यावेळी कुलदीपने चहलला विराट कोहली, एमएस धोनी, रिषभ पंत, इशांत शर्मा अशा खेळाडूंची नक्कल करुन दाखवली. चहलनेही ही नावे अचूक ओळखली.

कुलदीप आणि चहल यांच्या जोडीचा हा मजेशीर व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘जेव्हा ‘कुल-चा’ जोडी एकाच फ्रेममध्ये असते तेव्हा मजा-मस्ती होणारच. श्रीलंका विरुद्ध भारत संघात होणाऱ्या मालिकेत या दोघांना पाहाण्यासाठी कोण-कोण उत्सुक आहे?’

अनेक दिवसांनंतर चाहत्यांना एकत्र खेळताना दिसू शकते ‘कुल-चा’ जोडी
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी अनेकदा एकत्र खेळताना मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना संघर्ष करायला लावला आहे. त्यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे अनेक फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. त्यांची जोडी ‘कुल-चा’ म्हणूनही ओळखली जाते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघे एकत्र एकाच सामन्यांत खेळताना खूप कमी वेळा पाहिले गेले आहे. पण आता अगामी श्रीलंकाविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेत ते एकत्र खेळताना दिसू शकतात.

असा आहे श्रीलंका दौरा 
या श्रीलंका दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले जाणार आहे. खरंतर या दौऱ्याला १३ जुलै रोजी सुरुवात होणार होती. मात्र, यजमान श्रीलंकेच्या गोटात कोरोना व्हायरसची प्रकरणे आढळल्याने काही दिवस हा दौरा पुढे ढकलण्यात आला.

आता या दौऱ्याला बदललेल्या वेळात्रकानुसार १८ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. १८ जुलैनंतर २० आणि २३ जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळला जाईल. त्यानंतर २५ जुलैपासून टी२० मालिकेला सुरुवात होईल. टी२० मालिकेतील सामने अनुक्रमे २५, २७ आणि २९ जुलै रोजी खेळले जातील. वनडे आणि टी२० मालिकेतील सर्व सामने कोलंबो येथेच होणार आहेत. (Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal played a fun game)

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव! थ्रोडाऊन स्पेशालिस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने २ खेळाडूंसह गोलंदाजी प्रशिक्षक क्वारंटाईन

नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे सोपवण्यात येणार ‘मोठी’ जबाबदारी; अखेर पंजाब काँग्रेसमधीलमधील वादावर तोडगा निघणार

“जर हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली, तर विराटसाठी अनेक समस्यांचे होईल निराकरण”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचे मत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---