---Advertisement---

नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे सोपवण्यात येणार ‘मोठी’ जबाबदारी; अखेर पंजाब काँग्रेसमधीलमधील वादावर तोडगा निघणार

On: गुरूवार, जुलै 15, 2021 8:40 PM
Navjot Singh Sidhu
---Advertisement---

पंजाबमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. पण सध्या पंजाबमधील काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह वाढत आहेत. तिथे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद समोर आले असून त्यामुळे दोन गट पडले आहेत. आता या वादावर तोडगा निघाल्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते हरीश रावत यांनी या वादावर तोडगा निघाल्याचे सांगितले आहे.

रावत यांनी म्हटले आहे की कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रीपदी असतील तर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ ट्विट केला होता. ज्यात सिद्धू यांनी म्हटले होते की, “आमचा विरोधी पक्ष आम आदमी पार्टीने (आप) माझे पंजाबसाठी केलेले काम आणि दृष्टी कायमच ओळखली आहे. २०१७ पासून शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, विज अशा अनेक समस्यांवर लढत सुरू असून पंजाबच्या जनतेने माझे काम पाहिले आहे, असे आपला वाटते. आज मी पंजाब मॉडेल सादर करत आहे. हे तर स्पष्ट आहे की, त्यांना माहीत आहे कोण पंजाबसाठी काम करत आहे.” सिद्धू यांच्या या ट्विटनंतर खळबळ उडाली होती.

पण, आता या वादावर तोडगा निघाला आहे. मात्र, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादामुळे सध्या पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या सुनील जाखड यांना आपले पद सोडावे लागणार आहे. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादाबद्दल बुधवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी बैठकही घेतली होती.

नवज्योत सिंग सिद्धू यांची कारकिर्द 
नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी क्रिकेटमध्येही मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर ५१ कसोटी सामन्यांत ३२०२ धावा केल्या आहेत. यात त्यांनी ९ शतके आणि १५ अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर १३६ वनडे सामने खेळले असून ४४१३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी ६ शतके आणि ३३ अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“जर हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली, तर विराटसाठी अनेक समस्यांचे होईल निराकरण”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचे मत

भारताविरुद्ध कारकिर्दीत अर्ध्यापेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या, पण इंग्लंडमध्ये भीतीपोटी केली नाही गोलंदाजी, वाचा त्या खेळाडूबद्दल

बिडीच्या पॅकेटवर झळकला मेस्सी, तर नेटकऱ्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---