मुंबई । भारतीय अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी देशासाठी क्रिकेटमध्ये मोठी कारकिर्द घडवू शकला नाही. तिन्ही प्रकारात मिळून एकूण तो 23 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला. 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा बिन्नी आपल्या कारकिर्दीत मात्र अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडण्यात यशस्वी झाला. या कामगिरीबद्दल अनिल कुंबळे यांनी एसएमएस करून त्याचे अभिनंदन केले होते.
बिन्नीने 2014 ला ढाका येथे बांगलादेशविरुद्ध वनडेत खेळताना 4.4 षटके गोलंदाजी केली होती. त्यात 2 षटके निर्धाव टाकून 4 धावांत 6 गडी बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, महमुदुल्ला, नासिर हुसेन, मुशरफी मुर्तझा आणि नासिर हुसेन यांना बाद केले होते. या दरम्यान तो भारताकडून वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला होता. यावेळी त्याने कुंबळेचा 21 वर्षांचा विक्रम मोडला होता. कुंबळेने 1993 ला वेस्ट इंडिजविरुद्ध 6.1 षटकात 12 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
बिन्नी एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना म्हणाला,”अनिल भाईचा विक्रम मोडणे ही काही खास गोष्ट होती. विक्रम मोडेल याची मला कल्पना नव्हती. त्यांच्याकडून अभिनंदनाचा संदेशही मिळाला. ज्यामध्ये लिहिले होते की, कर्नाटकाच्या खेळाडूला हा विक्रम मोडताना पाहून खरोखर आनंद झाला.”
तो म्हणाला, “त्यावेळी रैना माझा कर्णधार होता. चेंडू योग्य टप्प्यावर टाकण्यास सांगितले होते. त्यावेळी खेळपट्टीमध्ये ओलसरपणा होता. त्याचा मी फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि अशी कामगिरी मी करू शकलो.”
“स्थानिक क्रिकेटमध्ये चेंडूच्या सहाय्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या सामर्थ्यानुसार चेंडू सीम आणि स्विंग करण्यावर भर देतो,” असे 36 वर्षीय स्टुअर्ट बिन्नीने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘घराणेशाही’च्या आरोपामुळे त्रस्त होता हा पाकिस्तानचा खेळाडू; बाथरूममध्ये रडायचा तासंतास
भारताचा हा युवा खेळाडू कमावतोय आफ्रिदीच्या तुलनेत आयपीएलमध्ये ३ पटीने अधिक रूपये
काॅफीही नशीबात नाही, कसोटी खेळत असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटरने व्यक्त केली खंत
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणारे ५ फलंदाज ….
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू