---Advertisement---

मॅच सुरू असतानाच मेंडिसच्या छातीत असह्य वेदना, दाखल करावं लागलं थेट हॉस्पिटलमध्ये

On: मंगळवार, मे 24, 2022 3:13 PM
Kusal- Mendis
---Advertisement---

क्रिकेटचा सामना सुरू असताना खेळाडूंना दुखापत झाल्याची घटना आपण अनेकदा पाहतो. अनेकदा खेळाडूंना वैद्यकिय कारणांमुळे अचानकपणे मैदानाच्या बाहेर नेले जाते. असंच काहीस श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडलं. श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिस (Kusal Mendis) फलंदाजी करत असताना अचानकपणे त्याच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यानंतर त्याला मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं आणि लगेच रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं.

सामना सुरु असताना लंच टाईमच्या आधीच्या शेवटच्या षटकात मेंडिसच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. दुखणं असह्य झाल्याने मेंडिस मैदानावर झोपला. संघातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले, मात्र थोड्या वेळाने छातीवर हात ठेवून काही वेळातच तो मैदानातून निघून गेला. अचानकपणे मेंडिसला त्रास सुरु झाल्याने श्रीलंकेचा संघ आणि सामना पाहत असलेले प्रेक्षक संभ्रमात पडलेले दिसले आहेत.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर मंजूर हसन चौधरी (Hasan Chaudhary) म्हणाले कि, “मेंडिसला योग्य उपचार आणि चांगली काळजी घेण्यासाठी रुग्णालयात न्यावे लागले. त्याला डिहायड्रेशन किंवा गॅस्ट्र्रिटिसचा त्रास होत असावा, ज्यामुळे तो अस्वस्थ वाटत होता. तपास आणि उपचार पूर्ण झाल्यानंतरच त्याच्या समस्येबाबत नेमके काही सांगता येणार आहे.” मेंडिसची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावी आणि मेंडिसने मैदानात उतरावं अशी प्रार्थना सध्या श्रीलंकेचे चाहते करत आहेत.

दरम्यान, याआधी देखील अनेकदा क्रिकेटच्या सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाल्याचे पाहाण्यात आले आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान कसोटी संघाचा सलामीवीर आबिद अली (Abid Ali) याला देखील सामना सुरु असताना छातीत दुखण्याच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. त्यानंतर आबिदवर उपचार करण्यात आले, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

‘…तर मी पुढच्या वर्षी चेन्नईसाठी खेळू शकतो’, वाचा असं का म्हणाला अमीर खान

Video: यॉर्करवर उत्तर शोधण्यासाठी परागने घेतली थेट मलिंगाचीच मदत, पाहा रियानचा खास ‘रियाज’

आयर्लंड दौऱ्यावर व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणला मिळणार भारतीय संघाची कमान? वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---