मंगळवारी (२० ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा ३८वा सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिमय, दुबई येथे झालेल्या या सामन्यात पंजाबने ५ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा हंगामातील चौथा विजय होता. यासह त्यांनी ८ गुणांची कमाई करत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने १९ षटकातच ५ विकेट्स गमावत दिल्लीचे आव्हान पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
पंजाबकडून फलंदाजी करताना निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकत ५३ धावा केल्या. तसच ग्लेन मॅक्सवेलनेही २४ चेंडूत ३२ धावा करत संघाच्या वियजात मोलाचे योगदान दिले. तर विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (२९ धावा), केएल राहुल (१५ धावा) आणि दिपक हूडा (१५ धावा) यांनीही धावा केल्या.
दिल्लीकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल आणि आर अश्विननेही प्रत्येकी एका फलंदाजाला पव्हेलियनला पाठवले. याउलट तुषार देशपांडेने सर्वात महागडी गोलंदाजी केली. त्याने २ षटकात सर्वाधिक ४१ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.
तत्पुर्वी दिल्लीकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवनने १०६ धावांची शतकी खेळी केली आणि सामनावीर पुरस्कार मिळवला. ६१ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकार ठोकत त्याने ही धावसंख्या गाठली. हे त्याचे आयपीएलमधील दूसरे शतक होते. त्याच्याव्यतिरिक्त दिल्लीचा कोणताही फलंदाज २० धावादेखील करु शकला नाही.
पंजाबकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर ग्लेन मॅक्सवेल, मुरुगन अश्विन आणि जेम्स नीशमने प्रत्येकी एक-एक विकेट घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
सगळे परवडले पण ‘हा’ नको! अश्विनच्या फिरकीपुढे ‘युनिव्हर्सल बाॅस’चा थरथराट!
मोठ्ठा गेम झाला यार! पूरनमुळे धाव चोरण्याचा सावळा गोंधळ अन् मयंक थेट तंबूत दाखल
‘अरे ही कसली एक्स्प्रेस ही तर झुकझुक मालगाडी’, माजी क्रिकेटरचा चेन्नईवर निशाना
ट्रेंडिंग लेख-
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली