---Advertisement---

थोडीशी गंमत! तब्बल ६ फूच ८ इंच उंची असलेल्या काईल जेमिसनची भर सामन्यात चाहत्यांबरोबर मस्ती

On: सोमवार, जून 21, 2021 2:07 AM
---Advertisement---

साऊथॅम्टन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात द रोज बाऊल स्टेडियमवर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा रविवारी(१९ जून) तिसरा दिवस होता. या दिवशी क्षेत्ररक्षण करताना न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू काईल जेमिसन चाहत्यांबरोबर मस्ती करताना दिसून आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

झाले असे की या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची ९ वी विकेट गेली होती. त्यानंतर ९३ व्या षटकादरम्यान बाऊंड्री लाईनजवळ काईल जेमिसन क्षेत्ररक्षण करत होता. त्या दरम्यान पाणी पित असताना त्याच्या लक्षात आले की मागे काही प्रेक्षक बसलेले आहेत. त्यावेळी एक कॅमेरा त्या प्रेक्षकांवर गेला. कॅमेराला पाहून प्रेक्षकांनी हात वर उचलून हलवायला सुरुवात केली.

याचवेळी ६ फूट ८ इंच उंची असलेल्या जेमिसन थोडी गंमत करण्याच्या हेतूने प्रेक्षकांच्या आणि कॅमेराच्या मधे मधे येत होता. हे पाहून अनेकांना हसू आवरता आले नाही.

https://twitter.com/LackOfToast/status/1406599185739051013

जेमिससने पहिला डाव गाजवला
जेमिसनसाठी या सामन्यातील पहिला डाव अविस्मरणीय ठरला. त्याने भारताच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना २२ षटकांत ३१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या विकेट्समध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत अशा धोकादायक फलंदाजांचा समावेश आहे.

याबरोबरच जेमिसन हा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका डावात ५ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. याशिवाय या संपूर्ण स्पर्धेत एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची त्याची ही ५ वी वेळ होती. त्यामुळे या स्पर्धेत सर्वाधिकवेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला.

न्यूझीलंडचे पहिल्या डावात वर्चस्व
भारताचा पहिला डाव ९२.१ षटकात २१७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने ४४ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त रोहित शर्मा ३४, शुबमन गिल २८ आणि आर अश्विनने २२ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काईल जेमिसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त नील वॅग्नर आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ आणि टीम साऊथीने १ विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथमने ७० धावांची सलामी भागीदारी केली. लॅथम ३० धावांवर बाद झाला. तर कॉनवे ५४ धावांवर बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाखेर २ बाद १०१ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेर कर्णधार केन विलियम्सन १२ धावांवर आणि रॉस टेलर शुन्यावर नाबाद आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

डेवॉन कॉनवेची विकेट इशांत शर्मासाठी ‘विक्रमी’; कुंबळे, कपिल देव, झहीरच्या पंक्तीत मिळवले स्थान

कोहली-रहाणे जोडी नंबर एक! कसोटीमध्ये २०१३ पासून केलाय ‘हा’ पराक्रम

अन् अचानकपणे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला WTC फायनलमध्ये खेळत नसलेला भुवनेश्वर कुमार, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---