आयपीएल स्पर्धेमध्ये जगभरातील अनेक प्रमुख खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. आंतरराष्ट्रीय सामन्यावेळी एकमेकांना कडवी झुंज देणारे हे खेळाडू आयपीएल वेळी मात्र एकत्र खेळतात. यादरम्यान एकाच संघात असलेल्या दोन देशांमधील खेळाडूंच्या मजबूत व कमकुवत दुवे यांची माहिती सरावावेळी इतर खेळाडूंना समजते. मात्र यावर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू व सध्या विराट कोहलीचा आरसीबी संघातील सहकारी असलेल्या काईल जेमिसनने उपाय शोधला आहे.
जेमिसनने नेटमध्ये विराटला गोलंदाजी करण्यास नकार दिल्याची बातमी समोर येत आहे. हा मोठा खुलासा आरसीबी संघातील दोघांचाही सहकारी असलेल्या डॅनियल ख्रिश्चनने केला आहे.
ख्रिश्चन म्हणाला की, आम्ही पहिल्या आठवड्यापासूनच तिघेही सोबत आहोत. एका सराव सत्राच्या समाप्तीनंतर विराट कसोटी क्रिकेटबद्दल बोलत होता. यावेळी तो जेमिसनला म्हणाला की तू कसोटीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्युक चेंडूने फार गोलंदाजी केली असेल. यावर जेमिसन हो असे म्हणाला. यानंतर विराट म्हणाला की जर तू मला आता ड्यूक चेंडूने गोलंदाजी केली तर मला आनंद होईल. यावर जेमिंसनने त्याला नम्रपणे नकार दिला.
जेमिसनने भारताविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात नेहमीच उत्तम कामगिरी केलेली आहे. त्याने अनेक वेळा विराटला आपल्या गोलंदाजीत चकवले देखील आहे. दरम्यान, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर इंग्लंडमध्ये काही दिवसांच्या अंतरातच कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्युझीलंड संघांमध्ये होणाऱ्या या अंतिम सामन्यामध्ये सर्वांचेच लक्ष असून या सामन्यात विराट व जेमिसन आमने-सामने असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आला शिखर धवन, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राजस्थानच्या आणखी एका खेळाडूने केले मोठे मन, कोविड रुग्णासाठी केली इतकी मदत