भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाला २००७ मध्ये टी२० विश्वचषकात विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे लालचंद राजपूत यांची एका नवीन जबाबदारीसाठी निवड करण्यात आली आहे. ५८ वर्षीय राजपूत यांना मुंबई क्रिकेट असोसिएनने आपल्या क्रिकेट सुधार समितीसाठी निवडले आहे.
राजपूत (Lalchand Rajput) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तान, झिंबाब्वेच्या क्रिकेट संघाचे आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला प्रशिक्षण दिले आहे.
एमसीएने (Mumbai Cricket Association) आपल्या क्रिकेट सुधार समितीसाठी शुक्रवारी (१७ जुलै) राजपूत यांच्यासोबतच समीर दिघे आणि राजू कुलकर्णी यांचीही निवड झाली आहे. अपेक्स काऊंसिलच्या एका सदस्याने पीटीआयशी बोलताना सांगितले, क्रिकेट सुधार समितीसाठी राजपूत यांच्यासोबत ३ नावांची निवड केली आहे.
अपेक्स काऊंसिलच्या एका सदस्याने बैठकीनंतर म्हटले, “त्यांना या समितीचा भाग व्हायचे आहे की नाही यावर त्यांची संमती घेतली जाईल. जर त्यांनी याला मंजुरी दिली, तर आम्ही त्यांना पत्र पाठवू.”
क्रिकेट सुधार समिती क्रिकेटशी संबंधित नियुक्त्या करते, ज्यामध्ये प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांचा समावेश आहे.
“आम्ही महाराष्ट्र शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करू आणि जोपर्यंत त्यांच्याकडून परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचे काम सुरू करणार नाही. त्याचबरोबर आम्ही बीसीसीआय काय निर्णय घेते ते पाहू आणि त्यानुसार स्पर्धेची योजना बनवू,” असे एका अधिकाऱ्याने म्हटले.
विशेष म्हणजे लालचंद राजपूत हे २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात पहिला टी२० विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघाचे मॅनेजर होते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळविला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हेन्री ओलोंगा: थेट आपल्याच देशाच्या राष्ट्रपतीला भिडलेला क्रिकेटर
-धोनीमुळेच भारताला विराट कोहलीसारखा मोठा मॅचविनर खेळाडू मिळाला!
-माजी दिग्गज म्हणतो, पुजाराला माझ्या वनडे संघात खेळू दिल्या असत्या ५० ओव्हर