क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ असे म्हटले जाते. यामागील कारण देखील तसेच आहे. खेळाडू आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत करत असतात. परंतु जर विरोधी संघातील खेळाडू अडचणीत असेल तर खिलाडूवृत्ती दाखवण्यासाठी देखील त्वरित सज्ज होतात. याचेच एक उत्तम उदाहरण इंग्लडमध्ये सुरू असलेल्या टी-२० ब्लास्ट स्पर्धेत पाहायला मिळाले आहे.
टी-२० ब्लास्ट स्पर्धेत पार पडलेल्या, लँकशायर आणि यॉर्कशायर यांच्यातील सामन्यात असे काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे, जे क्रिकेट या खेळातील खूप चांगले उदाहरण होते. परंतु धावांचा बचाव करणाऱ्या संघासाठी ते तितकेच धोकादायक ठरले आहे. (Lancashire croft goes down injured mid run and Joe roots decide not to run him out watch video)
तर झाले असे की, लँकशायर संघातील दोन फलंदाज स्टीवन क्रॉफ्ट आणि ल्युक वेल्स हे फलंदाजी करत होते. वेल्स जेव्हा २७ धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा त्याने मिड ऑफच्या दिशेने एक धाव घेण्यासाठी शॉट खेळला. धाव घेत असताना नॉन स्ट्राइकला असलेला फलंदाज, स्टीवन क्रॉफ्टच्या मांसपेशी खेचल्या गेल्या. ज्यामुळे तो खेळपट्टीच्या मध्येच पडला. त्याला भरपूर वेदना होत होत्या. तसेच त्याची धाव देखील पूर्ण झाली नव्हती. यॉर्कशायर संघ त्याला धावबाद करू शकत होता. परंतु जो रूटच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या यॉर्कशायर संघाने खिलाडूवृत्ती दाखवत त्याला बाद केले नाही.
ज्याला सोडले त्यानेच तोडले!
यॉर्कशायर संघाने या सामन्यात खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले, परंतु त्यांना याचा जबरदस्त फटका बसला. या सामन्यात लँकशायर संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. स्टीवन क्रॉफ्ट या विजयाचा शिल्पकार ठरला, ज्याला जो रूटने धावबाद करण्यास नकार दिला होता. क्रॉफ्टने या सामन्यात नाबाद २६ धावांची महत्त्वपुर्ण खेळी केली. तसेच त्याचा सहकारी ल्यूक वेल्सने ३० धावांची खेळी केली.
एक षटक शिल्लक असताना जिंकला सामना
यॉर्कशायर संघाने या सामन्यात २० षटकअखेर ७ बाद १२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लँकशायर संघाने हे आव्हान १९ व्या षटकात पूर्ण करत हा सामना आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
त्याच्यात सेहवागची छबी दिसते; जबरदस्त फॉर्मात असलेल्या ‘या’ भारतीय शिलेदाराची विरोधी संघातून स्तुती
आज हिरो असलेल्या ईशानला काही वर्षांपूर्वी लोकांनी केली होती मारहाण, दिली गेलेली पोलीस तक्रार
रांचीतील मैदाने गाजवणारा इशान किशन पुढे बनला रोहितचा हुकमी एक्का, वाचा त्याच्याबद्दल






