---Advertisement---

‘कुलचा’ जोडी आउट ऑफ फॉर्म, त्यांच्याऐवजी ‘हा’ गोलंदाज चांगला खेळेल; माजी क्रिकेटरचे मत

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 12:56 PM
Kuldeep Yadav, Yuvendra Chahal And MS Dhoni
---Advertisement---

भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांना संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परंतु आगामी श्रीलंका दौऱ्यावर या दोघांनाही खेळायची शेवटची संधी मिळू शकते. या दौऱ्यावर चांगली कामगिरी केल्यास त्यांना भारतीय संघात स्थान निश्चित करता येऊ शकते.

यात काहीच शंका नाही की, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे अप्रतिम गोलंदाज आहेत. परंतु माजी भारतीय फिरकीपटू आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचे असे म्हणणे आहे की, चहल ऐवजी वरून चक्रवर्ती चांगली कामगिरी करेल. (Last chance for Kuldeep Yadav and yuzvendra chahal to recreate the old magic)

वरून चक्रवर्ती ठरेल उत्तम पर्याय

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी म्हटले की, “भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यावर वरून चक्रवर्तीला संधी द्यायला हवी. यासह त्याला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील संधी दिली गेली पाहिजे. जर वरून चक्रवर्तीने फिटनेसवर लक्ष केंद्रित केले तर, तो नक्की टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणार.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “गेल्या काही वर्षात फलंदाजांना चहलची गोलांदाजी चांगलीच समजली आहे. ज्यामुळे फलंदाज त्याची गोलंदाजी सहजरीत्या खेळून काढतात. त्यामुळे त्याने आपल्या गोलंदाजीत विविधता आणणे आवश्यक आहे.”

असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका 
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग

महत्वाच्या बातम्या-

भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव! थ्रोडाऊन स्पेशालिस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने २ खेळाडूंसह गोलंदाजी प्रशिक्षक क्वारंटाईन

चर्चा तर होणारच! भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने चाहत्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

‘मी फक्त सांगतोय!’ भारताचे दोन्ही यष्टीरक्षक आयसोलेशनमध्ये असल्याने दिनेश कार्तिकने पुढे केला मदतीचा हात?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---