पुणे: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर(सर) स्मृती करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत 2एन् क्रिकेट अकादमी संघाने परंडवाल स्पोर्टस् क्लब संघाचा तर सस्ते झिल स्पोर्ट्स अकादमी संघाने यंग स्टार क्रिकेट अकादमी संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अर्पित सिंगच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 2एन् क्रिकेट अकादमी संघाने परंडवाल स्पोर्टस् क्लब संघाचा 9 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना 2एन् क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 8 बाद 151 धावा केल्या. अर्पित सिंगने 55 चेंडूत 8 चौकार व एका षटकारासह 69 धावा करून संघाचा डाव बळकट केला. निशांत शेवाळेने 28 धावा करून अर्पितला सुरेख साथ दिली. 151 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वरद चिद्रवार , सजय व निलय काशिद यांच्या अचूक गोलंदाजीने परंडवाल स्पोर्टस् क्लब संघाचा डाव 20 षटकात 9 बाद 142 धावांत रोखत विजय मिळवला. अर्पित सिंग सामनावीर ठरला.
दुस-या सामन्यात संकेत मोसेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर सस्ते झिल स्पोर्ट्स अकादमी संघाने यंग स्टार क्रिकेट अकादमी संघाचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
2एन् क्रिकेट अकादमी- 20 षटकात 8 बाद 151 धावा(अर्पित सिंग 69 (55, 8×4, 1×6), निशांत शेवाळे 28(24, 3×4), विघ्नेश लाड 2-15, ओमकार जाधव 2-30) वि.वि परंडवाल स्पोर्टस् क्लब- 20 षटकात 9 बाद 142(सुधांशू कांबळे 24(17, 3×4), ओम पाटील 21(37, 1×4), वरद चिद्रवार 2-29, सजय 2-13, निलय काशिद 1-20) सामनावीर- अर्पित सिंग
2एन् क्रिकेट अकादमी संघाने 9 धावांनी सामना जिंकला.
यंग स्टार क्रिकेट अकादमी- 16 षटकात सर्वबाद 65 धावा(कृष्णा अग्रवाल 27(34, 6×4), फरहान शेख 2-7, संकेत मोसे 2-17, अनिकेत सोनकांबळे 2-12) पराभूत वि सस्ते झिल स्पोर्ट्स अकादमी- 13.4 षटकात 5 बाद 66 धावा(एसके अझीज 30(36, 6×4), कृष्णा शिंदे 18(19, 3×4), यश नेहेते 2-14, कृष्णा अग्रवाल 2-17) सामनावीर- संकेत मोसे
सस्ते झिल स्पोर्ट्स अकादमी संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.