आयसीसीने आज (23 ऑक्टोबर) रोजी ताजी क्रमवारी जाहीर केली असून त्यात मोठे बदल दिसून आले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये दोन्ही संघांच्या अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. ज्याचा परिणाम आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही दिसून आला आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने गोलंदाजांच्या क्रमवारीतही चांगली कामगिरी केली आहे. कुलदीप शिवाय किवी संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनेही गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
कुलदीप यादवबद्दल बोलायचे झाले तर बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्ध मैदानात परतताना त्याने एकूण 3 बळी घेतले. यासह कुलदीप आता आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत 668 रेटिंग गुणांसह थेट 15 व्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये त्याने एका स्थानाने झेप घेतली आहे. याशिवाय किवी संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनेही 2 स्थानांची झेप घेतली आहे. बेंगळुरू कसोटी सामन्यात हेन्रीने 8 विकेट घेतल्या होत्या. यासह, तो आता कसोटीतील गोलंदाजी क्रमवारीत 2 स्थानांनी झेप घेत टाॅप-10 मध्ये सामील झाला आहे. ज्यामध्ये तो आता 751 रेटिंग गुणांसह 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या बेंगळुरू कसोटीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. पण तरीही ते आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जसप्रीत बुमराहचे 871 तर अश्विनचे 849 रेटिंग गुण आहेत. टॉप-10 मधील इतर गोलंदाजांवर नजर टाकल्यास नॅथन लियॉनने एका स्थानाने झेप घेतली असून तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
हेही वाचा-
IND VS NZ; पंत की जुरेल? दुसऱ्या कसोटी सामन्यात विकेटकीपिंग कोण करणार?
मेगा लिलावापूर्वी मोठा गेम होणार! दिल्ली कॅपिटल्स पंतला रिलिज करण्याची शक्यता, हे दोन संघ रिषभच्या मागे
न्यूझीलंडच्या फलंदाजाने रचला इतिहास, झळकावले सर्वात जलद द्विशतक






