---Advertisement---

दुसरी ऍशेस कसोटी जिंकत कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी, भारत ‘या’ क्रमांकावर

Australia
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिकेचा (ashes series) थरार सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम कामगिरी करत २७५ धावांनी विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. तसेच सलग २ विजयासह ऑस्ट्रेलिया संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England)यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवताच ऑस्ट्रेलिया संघाला जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा गुणतालिकेत श्रीलंका संघासह संयुक्तरीत्या पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांचे २४ गुण आहेत. श्रीलंका संघाने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध २ कसोटी सामने खेळले होते. या दोन्ही कसोटी सामन्यात श्रीलंका संघाने विजय मिळवला होता. जर ऑस्ट्रेलिया संघाला पुढील सामना जिंकण्यात यश आले तर, ऑस्ट्रेलिया संघ सर्वोच्च स्थानी पोहचू शकतो.

नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. या विजयानंतरही भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाचे एकूण गुण सर्वात जास्त आहेत, तरीदेखील भारतीय संघ विजयाच्या टक्केवारीनुसार श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानपेक्षा खाली आहे. (latest points table of icc world test championship)

काय सांगतो आयसीसीचा नियम?
आयसीसीच्या नियमानुसार, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत विजयाची सरासरी पाहिली जाते. त्यामुळे श्रीलंका(Sri Lanka) संघाचे गुण २४ असले तरीदेखील त्यांची विजयाची सरासरी १०० टक्के आहे. हेच कारण आहे की, ते पहिल्या स्थानी आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघाने देखील २ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २ विजय मिळवत ऑस्ट्रेलिया संघाने २४ गुणांची कमाई केली आहे. तसेच विजयाची सरासरी १०० टक्के असल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ श्रीलंका संघासह संयुक्तरीत्या पहिल्या स्थानी आहे.

https://twitter.com/ICC/status/1472867136158715907?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1472867136158715907%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-17194984053371673278.ampproject.net%2F2112032204000%2Fframe.html

भारतीय संघाने (Indian team) ३ कसोटी सामन्यात विजय मिळवले आहे, तर २ कसोटी सामने अनिर्णीत राहिले होते आणि एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाचे सर्वात जास्त गुण आहेत. परंतु, विजयाची सरासरी ५८.३३ असल्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.

महत्वाच्या बातम्या :

क्रिकेटपटू रिषभ पंतची उत्तराखंड सरकारकडून राज्याचा ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून नियुक्ती, पण काय असते जबाबदारी? जाणून घ्या

“रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसेही खर्च करू शकतो”, संघसहकाऱ्याकडून कर्णधाराचे कौतुक

बीसीसीआयने विराटविरोधात आखले होते षडयंत्र? महत्वाची माहिती समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---