एकीकडे टी२० विश्वचषक २०२१ च्या जल्लोषात सुरू आहे, तर दुसरीकडे एका महिला गोलंदाजाने क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घातला आहे. टी२० सामन्याच्या अखेरच्या षटकात सलग पाच चेंडूंमध्ये पाच फलंदाज बाद होण्याचा ऐतिहासिक कारनामा झाला आहे. ही ऐतिहासिक घटना ब्राझील आणि कॅनडाच्या महिला संघांच्या सामन्यामध्ये घडली आहे. तसेच हे षटक लॉरा कार्डोसो या महिला गोलंदाजाने टाकले होते. सध्या आयसीसी महिला टी२० विश्वचषकाच्या पात्रतेसाठी अमेरिका विभागात हे सामने खेळवले जात आहेत.
ब्राझील आणि कॅनडा महिला संघांमधील हा सामना पावसामुळे १७-१७ षटकांचा खेळ करण्यात आला. यामध्ये ब्राझील महिला क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावत ४८ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार रॉबर्टा एव्हरीने सर्वाधिक २१ धावा केल्या. इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकली नाही.
कॅनडाच्या महिला संघासाठी हिबा शमसादने चार षटके टाकली आणि आठ धावांत तीन गडी बाद केले. त्याचवेळी अजमतने ११ धावांत दोन गडी बाद केले. ब्राझीलच्या संपूर्ण डावात फक्त दोन चौकार आले. कर्णधार रॉबर्टा ऍव्हरीने आपल्या खेळीत हे चौकार लागावले. कॅनडाला सामना जिंकण्यासाठी ४९ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
ब्राझीलच्या फलंदाजांनी ज्या प्रमाणे फलंदाजी करताना संघर्ष केला, त्याचप्रमाणे माफक ४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनडाची अवस्थाही बिकट होती.
कॅनडाकडून देखील केवळ मुखविंदर गिल हिला दुहेरी आकडा गाठता आला. गिलने १९ धावा केल्या. कॅनडाने एका क्षणी १९ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. मात्र, मुखविंदर गिलने संघाला विजयाच्या जवळ नेले होते. त्यामुळे १६ षटकांनंतर कॅनडाची धावसंख्या पाच बाद ४६ धावा अशी होती.
शेवटच्या षटकात कॅनडाला विजयासाठी फक्त तीन धावा हव्या होत्या आणि त्यांच्या पाच विकेट्स शिल्लक होत्या. याचवेळी अखेरच्या षटकात ब्राझीलकडून गोलंदाजीची जबाबदारी लॉरा कार्डोसोने स्वीकारली. या षटकापूर्वी तिने दोन षटके टाकली होती आणि एक निर्धाव षटकासह सात धावा दिल्या होत्या. तिला एकही विकेट मिळाली नव्हती.
मुखविंदर गिलने शेवटच्या षटकातील पहिला चेंडू खेळला, पण तिला एकही धाव मिळाली नाही. दुसऱ्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न झाला, पण क्रमा कपाडिया धावबाद झाली. यानंतर तिसऱ्या चेंडूवर हाला अजमत आणि चौथ्या चेंडूवर हिबा शमशाद त्रिफळाचीत झाली. पाचव्या चेंडूवर सना जफरने ब्राझीलची कर्णधार रॉबर्टा आवारीचा झेल घेतला. अशा प्रकारे लॉराची हॅट्रिक झाली. तसेच या षटकात चार विकेट पडल्या, पण एकही धाव झाली नव्हती.
https://twitter.com/MorettiAvery/status/1452971987471642625
शेवटच्या चेंडूवर मुखविंदर गिलने धाव घेण्याचा प्रयत्न केला पण तीही दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाली. अशाप्रकारे ब्राझीलने हरलेला सामना अवघ्या एका धावेने जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेचे कांगारूंपुढे लोटांगण; ऑस्ट्रेलियाची मोठ्या विजयासह गुणतालिकेत आघाडी
दिल्लीला पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहचवणारा कर्णधार श्रेयस अय्यर सोडणार संघाची साथ?






