भारतीय संघाने झिम्बाब्वे दौरा चांगल्या प्रकारे पार पाडला आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेला क्लीन स्वीप दिल्यानंतर संघ आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज आहे. परंतु, या प्रमुख स्पर्धेआधी भारतीय संघाला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या रूपात मोठा झटका मिळाला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे द्रविड आशिया चषकादरम्यान संघासोबत असेल, याची खूपच कमी शक्यता आहे. तर दुसरीकडे एनसीएचा प्रमुख वीवीएस लक्ष्मण संघासोबत यूएईला रवाना झाल्याचे समोर येत आहे.
भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आशिया चषकासाठी संघासोबत यूएईला रवाना होणार होता. पण त्याआधीच त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अशात बीसीसीआय राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएचा प्रमुख वीवीएल लक्ष्मण (VVS Laxman) याला संघासोबत यूएईला पाठवणार असल्याचेही सांगितले जात होते. आता हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. तत्पूर्वी नुकत्याच पार पडलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात लक्ष्मण संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत गेला होता.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात काही असे खेळाडू होते, ज्यांची निवड आशिया चषकासाठीही केली गेली आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार संघातील हे काही मोजके खेळाडू आणि लक्ष्मण आशिया चषकासाठी यूएईत दाखल झाले आहेत. हरारे स्टेडियममधून जो भारतीय संघ मायदेशात परत आला, त्यांच्यासोबत लक्ष्मण नव्हता. अशात पूर्ण शक्यता आहे की, तो संघातील इतर खेळाडूंना घेऊन यूएईला रवाना झाला असावा.
राहुल द्रविड स्वतः कोरोना संक्रमित असल्यामुळे संघाला मार्गदर्शन करण्यासाठी वीवीएल सर्वोत्तम पर्याय आहे. त्याच्या मार्गदर्शनातील भारतीय संघाने झिम्बाब्वेला चांगलीच धूळ चारली आहे. माध्यमांमध्ये जरी लक्ष्मण खेळाडूना घेऊन यूएईला गेल्याचे सांगितले जात असले, तरी बीसीसीआयने अद्याप याविषयी कसलीही अधिकृत माहिती दिली नाहीये. लवकरच बीसीसीआकडून याविषयी अधिकृत माहिती दिली जोऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टी-२० विश्वचषकासाठी फिट रहायचंय’, इंग्लिश वेगवान गोलंदाची ‘द हंड्रेड’ लीगमधून माघार
बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर
भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात ‘या’ पाच जणांत रंगणार ‘बॅटिंग बॅटल’