भारत देश सध्या कोरोना व्हायरसच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. रोज या कोरोना व्हायरसच्या विळख्यात रोज लाखो लोक अडकत आहेत. तसेच सध्या वैद्यकीय सुविधांचाही तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थित अनेक सेलिब्रेटीं, खेळाडूंनी तसेच सामाजिक संस्थांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. यात आता माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्ला याचेही नाव जोडले गेले आहे.
शुक्लाचा गुरुवारी (६ मे) ४० वा वाढदिवस होता. त्यामुळे त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आयपीएल २०२१ मध्ये समालोचनातून केलेली कमाई कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्याने ट्विट करत माहिती दिली आहे.
त्याने ट्विट केले आहे की ‘आज ६ मे रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त मी आयपीएल २०२१ मध्ये समालोचनातून केलेली कमाई पश्चिम बंगाल मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान करत आहे. कोरोनाच्या परिस्थितीशी लढण्यासाठी माझ्याकडून हे छोटे योगदान.’
Today, 6th May 2021, on my Birthday, am humbly Donating my entire #IPL2021 commentary fees, to the #westbengal #CHIEFMINISTERRELIEF FUND. A small contribution to fight this disastrous 2nd wave Corona Situation ,from my end for my people🙏WinCorona #COVID19 #StaySafe #India #LRS
— Laxmi Ratan Shukla 🏏 (@Lshukla6) May 6, 2021
शुक्लाने भारताकडून फक्त ३ वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ९.००च्या सरासरीने फक्त १८ धावा केल्या आणि १ विकेट घेतली होत्या. सप्टेंबर १९९९मध्ये शुक्लाने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. जरी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने बंगालचे नेतृत्वही केले आहे.
शुक्लाने १३७ प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये त्याने ६२१७ धावा केल्या असून १७२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १४१ अ दर्जाच्या सामन्यांत २९९७ धावा केल्या आणि १४३ विकेट्स घेतल्या आहेत. या शिवाय त्याने ८१ टी२० सामने देखील खेळले असून ९९४ धावा केल्या आहेत आणि ४७ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याबरोबर तो क्रिकेटनंतर राजकारणाच्या मैदानातही उतरला. तो बंगालमध्ये क्रीडामंत्री होता.
अन्य खेळाडूंनीही केली आहे कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदत
आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटू कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात मदतीसाठी पुढे आहेत. यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर, हार्दिक आणि कृणाल पंड्या, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन असे काही भारतीय खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. याशिवाय आयपीएलमधील अनेक संघांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
एवढेच नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि एस्टोनिया क्रिकेट बोर्डांनींही भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या उर्वरित १४ व्या हंगामाचे आयोजन होणार इंग्लंडमध्ये? पाहा काय आहे प्रकरण
आठवणीतील सामना! जेव्हा रोहित शर्माने आयपीएलमध्ये घेतली होती हॅट्रिक, वाचा त्या सामन्याबद्दल सविस्तर