इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल )(IPL) स्पर्धेचे १५ वे हंगाम सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत अहमदाबाद (Ahmadabad) आणि लखनऊ (lucknow) हे दोन नवीन संघ खेळताना दिसून येणार आहेत. तर या स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव सोहळा पार पडणार आहे. हा लिलाव सोहळा १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या आयोजनाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
यावर्षी आयपीएल स्पर्धेत १० संघ खेळताना दिसून येणार आहेत. तसेच ७४ सामने खेळले जाणार आहेत. हे सामने मुंबईमध्ये आयोजित केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहेत. तसेच आवश्यकता भासल्यात हे सामने पुण्यामध्ये देखील आयोजित केले जाऊ शकतात, तर स्पर्धेतील प्लेऑफचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित केले जाऊ शकतात.
अधिक वाचा – बीबीएलमध्ये धमाका केलेल्या पंचरत्नांवर असेल आयपीएल फ्रॅंचाईजींची नजर
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सध्या बीसीसीआय (BCCI) महाराष्ट्रात साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन करण्याच्या विचारात आहे, तर प्लेऑफचे सामने अहमदाबादमध्ये आयोजित केले जाऊ शकतात. तसेच या वृत्तात असे देखील म्हटले गेले आहे की, बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (२७ जानेवारी ) एका मुलाखत घेतली होती.
ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणात राहिली, तर ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाऊ शकते. तसेच जर स्थिती नियंत्रणात आली नाही, तर ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाईल. २०२० आणि २०२१ मध्ये या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते.
व्हिडिओ पाहा – ‘बाप बाप होता है…’ असं सेहवागने अख्तरला कधी म्हटलंच नव्हतं?
तसेच या वृत्तात असे देखील म्हटले गेले आहे की, बीसीसीआय प्रेक्षकांना २५ टक्के मर्यादेसह स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देऊ शकते. यासाठी बीसीसीआय राज्य सरकारची अनुमती घेण्याच्या विचारात आहे. ही स्पर्धा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुरू होऊ शकते. तसेच १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेच्या मेगा लिलावाचे आयोजन केले जाऊ शकते. तसेच या मेगा लिलावात १२ पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :
विराट कोहली नव्हे, तर ‘हे’ आहेत भारताचे सर्वोत्तम कर्णधार, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य‘
हे नक्की पाहा :