fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अखेर ‘त्याने’ निवृत्तीचा निर्णय सोपवला चाहत्यांवर…

Leander Paes asks Fans to give advice on his Retirement

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने म्हटले की, तो आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय खेळ पुन्हा सुरु झाल्यावर घेणार आहे. परंतु यावेळी त्याने चाहत्यांकडून सल्ला मागितला की, त्याने २०२१मध्ये खेळणे सुरु ठेवले पाहिजे की नाही.

आपल्या शानदार कारकीर्दीत ग्रँडस्लॅमचे दुहेरी आणि मिश्र दुहेरी असे एकूण १८ विजेतेपदक जिंकणाऱ्या पेसने (Leander Paes) ट्विटरवरील एका लाईव्ह सेशनमध्ये प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तो म्हणाला की, “चाहत्यांनो मला सांगा की, मी २०२१मध्ये खेळणे सुरु ठेवले पाहिजे की नाही.”

पेसने मागील वर्षी म्हटले होते की, “२०२०चा हंगाम माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवटचा मोसम असेल.” परंतु कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे ऑलिंपिक पुढे ढकलेल आहे. अशामध्ये ४६ वर्षीय पेसच्या कारकीर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

पेस एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला की, “माझ्यासाठी पुढील निर्णय घेणे महत्त्वाचे असेल. कारण ऑलिंपिक एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. ग्रँडस्लॅमच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे. फ्रेंच ओपन ऑक्टोबरमध्ये होईल. यूएस ओपन न्यूयॉर्कच्या बाहेर खेळण्यात येईल. विंबल्डनदेखील रद्द करण्यात आले आहे.”

तो पुढे म्हणाला की, “मला तुम्हाला विचारायला आवडेल की, मी २०२१मध्ये खेळले पाहिजे का? हा खेळ मला खूप आवडतो. याव्यतिरिक्त खेळ खेळण्याचे काय कारण असेल? मला यासाठी प्रेरणा हवी आहे. याच प्रेरणेमुळे मी दररोज ३ ते ४ तास सराव करत आहे. तसेच जिममध्ये खूप वर्कआऊटदेखील करत आहे.”

“जर चाहत्यांनी मला याचे उत्तर दिले की मला खेळणे का सुरु ठेवले पाहिजे. असे होऊ शकते की, तुमच्यापैकी एका चाहत्याच्या उत्तरामुळे मला प्रेरणा मिळेल आणि मला निवृत्तीबाबत (Retirement) निर्णय घेता येईल,” असेही पेस यावेळी म्हणाला.

लॉकडाऊनमध्ये (Lockdown) मिळालेल्या मोकळ्या वेळेबद्दल बोलताना तो म्हणाला की, “सलग ३० वर्षे जगभरात टेनिस (Tennis) खेळल्यानंतर आता थोडी विश्रांती मिळणे माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. निवृत्तीपूर्वी वेगवेगळ्या पैलूंवर काम करण्यासाठी मला वेळ मिळाला आहे.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-काहीही न सांगता मला टीममधून बाहेर केलं, मित्र कोहलीनेही केली नाही मदत

-ड्रेसिंग रुममध्ये मला मारणार होते रिचर्ड्स, पाय पकडून मागितली माफी

-कोहलीला सतत तंबूचा रस्ता दाखवणारे जगातील ५ गोलंदाज

You might also like