भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 2 वर्षे उलटली आहेत. मात्र, तो अजूनही इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळताना दिसतो. असे असले, तरीही एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्ती कधी घेणार? हा प्रश्न अजून तरी संपण्याचे नाव घेत नाहीये. स्वत: धोनीनेही यावर स्पष्ट वक्तव्य केले नाहीये. आयपीएल २०२३ स्पर्धेच्या सुरुवातीला असे म्हटले जात होते की, हा त्याचा अखेरचा हंगाम असेल, पण आता अनेक चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी म्हटले आहे की, तो पुढील हंगामही खेळू शकतो. दुसरीकडे, धोनीने सातत्याने या प्रश्नावर कोणतेही सरळ उत्तर दिले नाहीये. तो नेहमीच हा प्रश्न टाळताना दिसला आहे. आता विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनीही यावर मत मांडले आहे.
काय म्हणाले कपिल देव?
भारतीय संघाला 1983 साली विश्वचषक (1983 World Cup) जिंकून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी एमएस धोनी (MS Dhoni) याच्या संभावित निवृत्तीवर आपले मत मांडले. माध्यमांशी बोलताना धोनीचे कौतुक करत कपिल देव म्हणाले की, तो 10व्यांदा आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन आला आहे. ते असेही म्हणाले की, धोनी आयुष्यभर खेळू शकत नाही.
कपिल देव म्हणाले की, “तो 15 वर्षांपासून खेळत आहे. आपण फक्त धोनीबद्दलच चर्चा का करत आहोत? त्याने त्याचे काम केले आहे. आपल्याला त्याच्याकडून आणखी काय हवंय? त्याने आयुष्यभर खेळावं असं आपल्याला वाटतं का? हे तर होणारच नाही. याव्यतिरिक्त आपण धन्यवाद म्हटले पाहिजे की, तो 15 वर्षे खेळला. जरी तो पुढील वर्षी खेळेल किंवा खेळणार नाही. निरोप घेण्यापूर्वी त्याने प्रभावी खेळ दाखवला. त्याने खूप जास्त धावा केल्या नाहीत, पण तो आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन आला. यावरूनच एका कर्णधाराचे महत्त्व समजते.”
आयपीएल 2023चा अंतिम सामना
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एन्ट्री केली आहे. मागील हंगाम संघासाठी खूपच खराब ठरला होता. मात्र, यावेळी त्यांनी शानदार खेळ दाखवत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. रविवारी (दि. 28 मे) गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना सुरू होऊ शकला नव्हता. त्यामुळे सामना सोमवारी खेळला जाईल. आता हा सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडेल.
सोमवारी गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघातील संपूर्ण सामना पार पडेल, याचा प्रयत्न केला जाईल, मात्र, जर असे झाले नाही, तर कमीत कमी सामना 5 षटकांचा खेळला जाईल. जर असेही झाले नाही, तर एक-एक सुपर ओव्हर खेळली जाईल. पावसाने जर असेही होऊ दिले नाही, तर साखळी फेरीत चेन्नईच्या पुढे असल्यामुळे गुजरात टायटन्स संघाला विजयी घोषित केले जाईल. (legend cricketer kapil dev blunt answer on ms dhoni retirement from ipl will surprise you)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! IPL फायनलपूर्वी समजली गिलची सर्वात मोठी कमजोरी, भारताच्या माजी दिग्गजाचा खुलासा
धोनीला लागू होत नाही इम्पॅक्ट प्लेयर नियम! भारतीय दिग्गजाने सकारण दिले पटवून