मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमिअर लीगमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत आयपीएलच्या 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. या ट्रॉफी मुंबईने रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. 20 एप्रिल रोजी रोहितने मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण करून 15 वर्षे पूर्ण केली. त्याने 15 एप्रिल, 2008मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी पहिला आयपीएल सामना खेळला होता. मात्र, रोहित पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला होता. असे असले, तरीही तो सध्या आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णदार आहे. रोहितच्या पदार्पणाबद्दलच्या एका कार्यक्रमात हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी रोहितच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल भाष्य केले.
काय म्हणाला हरभजन?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि इरफान पठाण यांना प्रश्न करण्यात आला. यावर हरभजन म्हणाला की, “त्याच्या फलंदाजीचे तर आम्ही चाहते आहोत. आयपीएलमध्ये त्याने आपल्या संघाला 5 ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. मात्र, तो जितका चांगला व्यक्ती आहे, तितका कदाचितच वर्तमानात कोणी त्याच्यासारखा व्यक्ती क्रिकेट खेळत असेल. तो हिऱ्यासारखा व्यक्ती आहे, जो आपल्या जुन्या मित्रांना आजही सोबत ठेवतो. सर्व मोठ्या व्यक्तींचा सन्मान आदर करतो. त्यामुळे रोहित एक चांगले व्यक्तिमत्त्व असणारा खेळाडू आहे.”
हरभजनच्या वक्तव्याशी इरफानही सहमत दिसला. हरभजन रोहितबद्दल पुढे म्हणाला की, “या खेळाडूला तुम्हाला वारंवार भेटावे वाटेल. विसरून जावा तुम्ही मैदानावर त्याने काय केले आहे, पण हीच रोहित शर्माचे यश आहे. एका व्यक्तीच्या आयुष्यातील यश हेच आहे की, तुम्ही इतरांशी कशाप्रकारे वागला आहात. त्यामुळे रोहित शर्माला देवाचा आशीर्वाद मिळाला आहे. अशीच कामगिरी करत राहा रोहित आणि यावेळीही ट्रॉफी मुंबईच्या नावावर झाली पाहिजे.”
रोहित शर्माच्या 6000 धावा
रोहित शर्माच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 232 सामन्यातील 227 डावांमध्ये फलंदाजी करताना 30.22च्या सरासरीने 6014 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 41 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, तो आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा चौथा खेळाडू आहे. त्याच्याआधी विराट कोहली, शिखर धवन आणि डेविड वॉर्नर यांनी 6000 धावा केल्या आहेत. (legend spinner harbhajan singh praise rohit sharma know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बला’त्कार प्रकरणात जामीनावर सुटलेल्या 22 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास, राशिदला पछाडत केली ‘अशी’ कामगिरी
बीसीसीआयचा मोठा निर्णय! Asian Gamesमध्ये भारतीय संघ पाठवण्यास दिला थेट नकार, कारण घ्या जाणून