fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

तब्बल १९ ग्रॅंडस्लॅम विजेत्या महान टेनिसपटू मारिया ब्युनो यांचे निधन

ब्राझीलच्या महान टेनिस खेळाडु मारिया ब्युनो यांचे तोंडाच्या कॅन्सरमुळे साओ पाउलोमधील हॉस्पिटलमध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मागील वर्षी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते, त्यावर त्या उपचार घेत होत्या. पण मे महिन्यात तब्येत आणखीनच खालावल्याने मारिया त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

“ब्राझीलियन क्वीन ऑफ टेनिस” आणि “साओ पाउलो स्वॅलो” अशा दोन टोपण नावांनी मारिया टेनिस जगतात प्रसिद्ध होत्या.

आपल्या टेनिस कारकिर्दित मारिया यांनी महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी मिळुन १९ ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावली. तसेच महिला एकेरीचे विंम्बलडन तीनवेळा, अमेरिकन अजिंक्यपद स्पर्धा (आताची अमेरिकन ओपन) चारवेळा जिंकली. विंम्बलडन जिंकणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील पहिल्या खेळाडु होत्या.

1958 मध्ये इटालियन अजिंक्यपद स्पर्धा जिंकत मारिया यांनी पहिल्यांदा टेनिस जगताच लक्ष वेधून घेतले. यात त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेच्या बड्या खेळाडुंचा पराभव केला. त्याच वर्षी अमेरीकेच्या अल्थेया गिब्सन सोबत विंम्बलडनचे दुहेरीतील विजेतेपद पटकावले. यानंतर त्यांच्या सुवर्ण कारकिर्दिला सुरुवात झाली. 60 चे दशक मारिया यांनी आपल्या खेळाने गाजवले.

१९५९, १९६०, १९६४ आणि १९६६ मध्ये जागतिक क्रमवारीत मारिया पहिल्या क्रमांकावर होत्या. १९७७ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर ब्राझीलचा टीव्ही चॅनल स्पोरटीव्हीवर समालोचक म्हणून काम पाहत होत्या. १९७८ मध्ये “टेनिस हॉल ऑफ फेम” मध्ये समावेश करण्यात आला.

माझ्या काळात टेनिस एवढे प्रसिद्ध नव्हते. मी स्पर्धा खेळायला जायचे तेव्हा फक्त दोनच सोबत रॅकेट असायचे. पहिल्यांदा विंम्बलडन जिंकले तेव्हा १५ पौंड बक्षीस मिळाले होते असे मारिया २०१५ ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या.

टेनिस जगतातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मायकल टेमर यांनी ही ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली.

You might also like