---Advertisement---

विराट कोहली झाला ३३ वर्षांचा! क्रिकेट जगतातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव, पाहा खास ट्वीट्स

On: शुक्रवार, नोव्हेंबर 5, 2021 8:11 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी आजचा दिवस (५ नोव्हेंबर) विशेष आहे. विराट कोहलीचा आज (५ नोव्हेंबर) वाढदिवस आहे. विराटचा हा ३३ वा वाढदिवस आहे आणि चाहत्यांमध्ये याविषयी उत्सुकता दिसत आहेत. कर्णधार विराट कोहली मागच्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे, तरीदेखील चाहत्यांचे त्याच्यावरील प्रेम किंचितही कामी झालेले दिसत नाही. चाहत्यांनी विराटला त्याच्या वाढदिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांना आशा आहे की, विराट कोहलीसाठी हा वाढदिवस विशेष असेल आणि तो यानंतर पुन्हा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये पुनरागमन करेल.

विराटला वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह इतरही दिग्गजांचा समावेश आहे. दिग्गजांनी या शुभेच्छा ट्वीटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या आहेत.

वीरेंद्र सेहवागने ट्वीटरवर विराट कोहलीला शुभेच्छा देताना एक खास संदेश दिला आहे. सेहवागने ट्वीटमध्ये लिहेले आहे की, ‘कठीण काळ नेहमी राहत नाही, पण मजबूत लोक नेहमी राहतात.’ तसेच त्याने विराटचे पुढचे वर्ष चांगले जाण्यासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू लक्ष्मणनेही विराटला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. लक्ष्मणने विराटला येणाऱ्या काळात प्रेम, यश आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अजिंक्य राहाणेने विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहाणेने विराटला येणारे वर्ष आनंददायी आणि आरोग्यसंपन्न जावो, असे म्हटले आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याचा किंग असा उल्लेख केला आहे. तसेच त्याने विराटला मोठा भाऊ, असेही म्हटले आहे. सिराजने विराट ज्यासाठी पात्र आहे, ते सर्व त्याला मिळेल असेही म्हटले आहे.

त्याचबरोबर नवदीप सैनीने विराटला हा वाढदिवस आनंदी आणि आरोग्यदायी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याने ट्वीटमध्ये विराटचा भैया असा उल्लेख केला आहे.

माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी विराटसोबतचा एक जुना फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटला आजचा हा दिवस आणि वर्ष चांगले जावो, असेही तो म्हणाला आहे.

दिग्गजांसोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयसीसीनेही विराटला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या टी२० विश्वचषक खेळत आहे. भारताची विश्वचषकातील सुरुवात काही खास झाली नसून संघाने त्याचे पहिले दोन सामने गमावले आहेत. त्यानंतर खेळला गेलेला तिसरा सामना संघाने जिंकला असला तरी उपांत्य सामन्यात जागा बनवण्यासाठी भारताला संघर्ष करावा लागणार आहे. भारतीय संघ विश्वचषकातील त्याचा चौथा सामना शुक्रवारी (५ नोव्हेंबर) स्कॉटलंडविरुद्ध खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘विक्रमवीर’ विराटचा वाढदिवस, बीसीसीआय शेअर केला खास व्हिडिओ

टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोण पोहोचणार आणि कोण जिंकणार? सेहवागने केली भविष्यवाणी

भारत का आहे सर्वात खतरनाक संघ? न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---